मुंबई : जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर स्टारर सिनेमा 'धडक' चा ट्रेलर रिलीज झालायं. मराठी सिनेमा 'सैराट'चा रिमेक आहे. २० जुलैला हा सिनेमा रिलीज होणार आहे. तुम्हाला माहिती आहे का पदार्पणाच्या सिनेमात श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरला १ कोटी मानधनही मिळाले नाही. मीडिया रिपोर्टनुसार तिला या सिनेमासाठी ४० ते ४५ लाख रुपये फिस दिली गेली.जान्हवीच नव्हे तर सिनेमातील हिरोला देखील खास रक्कम मिळाली नाही. एक नजर टाकूया इतर स्टारकास्टच्या मानधनावर...
शाहिद कपूरचा भाऊ ईशान सिनेमात जान्हवीच्या हिरोची भूमिका साकारत आहे. त्याला या सिनेमासाठी ६० ते ७० लाख रुपये मिळाल्याची चर्चा आहे. याआधी त्याने माजिद माजीदी यांच्या 'बियॉन्ड द क्लाउड' या सिनेमात काम केलंय.
धडकमध्ये आशुतोष राणा हिरोईन जान्हवीच्या वडिलांच्या भूमिकेत आहे. या रोलसाठी त्याला ५० लाख मिळाल्याचे सांगण्यात येते.
'हम्टी शर्मा की दुल्हनिया' आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया' बनविलेल्या शशांकने जान्हवीचा डेब्यु सिनेमा दिग्दर्शित केलाय. यासाठी त्याला ४ कोटी मानधन देण्यात आलं.
मराठी सिनेमा 'सैराट' ची कहाणी नागराज मंजुळेने लिहिली आहे. 'धडक' सिनेमा 'सैराट'चाच रिमेक आहे. नागराजला या कहाणीसाठी २ कोटी रुपये मानधन दिले गेल्याची चर्चा आहे.
या सिनेमालाही अजय-अतुल यांनी संगीत दिलंय. दोघांना या कामासाठी साधारण १.५ कोटी रुपये फिस मिळाल्याच सांगण्यात येत