मुंबई : कंगना रानौतने मुंबईत पीओकीमध्ये असल्याची भावना येतेय, असं वक्तव्य केलं. यानंतर चहुबाजुंनी टीका होत आहे. ज्या मुंबईने या कलाकारांना ओळख दिली, प्रसिद्धी दिली तेच कलाकार आज मुंबईबद्दल असं वक्तव्य करत आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी कंगनावर टीका केली आहे.
'याच मुंबईने तुमच्या सारख्या अनेकांना आसरा दिला आहे, ग्लॅमर-करिअर दिलंय. एखादी व्यक्ती इतकं कृतघ्न दोनच परिस्थितीत वागू शकते, एकतर ती संस्कारानेच कृतघ्न घडलेली असते किंवा तिचे मानसिक संतुलन ढासळलेले असते', असं ट्विट धनंजय मुंडेंनी केली आहे.
याच मुंबईने तुमच्या सारख्या अनेकांना आसरा दिला आहे, ग्लॅमर-करिअर दिलंय. एखादी व्यक्ती इतकं कृतघ्न दोनच परिस्थितीत वागू शकते, एकतर ती संस्कारानेच कृतघ्न घडलेली असते किंवा तिचे मानसिक संतुलन ढासळलेले असते. #GetWellSoonKangana #LoveforMumbai https://t.co/IJ4Cwetqey
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 4, 2020
#GetWellSoonKangana आणि #LoveforMumbai हे दोन हॅशटॅग वापरून त्यांनी कंगनाला लवकर बरी हो असा सल्ला दिला आहे.
कंगनाच्या मुंबईच्या वक्तव्यावरून वातावरण पेटलं आहे. यावरून कंगनाला मुंबईत न येणाचा सल्ला देणाऱ्यांना कंगनाने पुन्हा एक आव्हान दिलं आहे. कुणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, असं म्हणत कंगनाने आपण ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याचं सांगितलं आहे.
'अनेकांनी मला मुंबईत परत न येण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आता मी येत्या आठवड्यात ९ सप्टेंबर रोजी मुंबईत प्रवास करणार आहे. मुंबई एअरपोर्टला उतरण्याची वेळ मी तुम्हाला ठरली की सांगेन. कुणाच्या बापात हिम्मत अशेल तर मला रोखून दाखवा',असं ट्विट कंगनाने केलं आहे.