सलमान खानच्या रेस 3 ला धर्मेंद्रच्या शुभेच्छा !

अभिनेता सलमान खान यंदाच्या ईदला 'रेस 3' हा सिनेमा घेऊन येणार आहे. 

Updated: Jun 13, 2018, 02:57 PM IST
सलमान  खानच्या रेस 3 ला धर्मेंद्रच्या शुभेच्छा !

मुंबई : अभिनेता सलमान खान यंदाच्या ईदला 'रेस 3' हा सिनेमा घेऊन येणार आहे. या सिनेमामध्ये सलमान खानसोबत बॉबी देओल, अनिल कपूर, साकिब सलीम , जैकलीन फर्नांडीज आणि डेजी शाह प्रमुख भूमिकेत आहेत. रेमो डिसुझा दिग्दर्शित या सिनेमाकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. 

धर्मेंद्र यांनी दिल्या शुभेच्छा 

अभिनेता धर्मेंद्र यांनी सलमान खानसह रेस 3 च्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. या चित्रपटात सलमान खानने बॉबी देओलला काम करण्याची संधी दिली आहे. यामुळे पुन्हा बॉबी देओलचं बॉलिवूडमध्ये पुनरागमन झाले आहे. मंगळवारी या सिनेमाचं सेलिब्रिटींसाठी खास स्क्रिनिंग झाले आहे.  

 

सॅटेलाईट राईट्स विकले 

रिलीज होण्यापूर्वीच 'रेस 3' या चित्रपटाचे सॅटेलाईट राईट्स विकले गेले आहेत. या चित्रपटाने दंगल या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडत सुमारे 130 कोटींना या चित्रपटाचे विकले गेले आहेत.