Rajveer Deol : सध्या राजवीर देओलचा 'दोनो' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 5 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाची जोरात चर्चा पाहायला मिळते आहे परंतु बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट मात्र फारच फिका पडला आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केलेली नाही. त्यामुळे सध्या यावरून स्पष्ट होते की कदाचित करण देओलप्रमाणे राजवीर देओलही पहिला डेब्यू हा फ्लॉप जाऊ शकतो. परंतु सध्या देओल कुटुंबियांनीही अशा सोडलेली नाही. धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यांनी या चित्रपटासाठी प्रार्थना केली आहे. धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी आपल्या चाहत्यांसाठी या चित्रपटाला चांगलं यश प्राप्त व्हावे म्हणून प्रार्थना केली होती. त्याचा हा अपील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. ते यात म्हणाले आहेत की, 'मित्रांनो, दोनो हा खूपच चित्रपट चांगला चित्रपट आहे. या चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना करूया.'
सनी देओल याचा Gadar 2 हा चित्रपट यावर्षी बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला होता. या चित्रपटाला समीक्षकांनीही चांगले रिव्ह्यूज दिले तर काहींनी नकारात्मक रिव्ह्यूज दिले. परंतु तरीही हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. या चित्रपटानं फार कमी कालावधीतच प्रचंड प्रमाणात पैसे कमावले. म्हणता म्हणता हा चित्रपट 600 कोटींच्याही वर गेला आहे. विकीपीडियानुसार, या चित्रपटानं 690.54 कोटी रूपयांची कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट यावर्षीच्या सर्वाधिक हीट चित्रपट ठरला आहे. परंतु आता राजवीरचा म्हणजेच त्याच्या धाकट्या मुलाचाही चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. परंतु त्याच्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाई पाहता सनी देओल हिट आणि राजवीर देओल फ्लॉप अशी गत झाली आहे.
हेही वाचा :
म्हणजे बाप हीट मुलगा फ्लॉप असं दिसून येते आहे. परंतु तरीही राजवीर देओल त्याच्या आगामी चित्रपटातून चांगली कमाई करू शकेल. सध्या त्याच्या या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाई फारच निराशाजनक आहे. या चित्रपटाला समीक्षकांनी मात्र चांगली दाद दिली आहे. सनी देओलचा मुलगा राजवीर देओल आणि पुनम ढिल्लो यांची मुलगी पलोमा ढिल्लो यांनी या चित्रपटातून डेब्यू केला आहे.
आपल्या पहिल्या वहिल्या डेब्यूबद्दल राजवीर देओलनं अनेक खुलासे केले होते. त्यामुळे त्याची जोरात चर्चाही रंगलेली पाहायला मिळाली होती. आपल्या भावाच्या डेब्यूवरून त्याला फार चांगला धडा घेतला होता असं तो म्हणाला होता. त्याचसोबत आपल्याच कुटुंबियांच्या प्रोडक्शन हाऊसमधून आपल्याला लॉन्च केले नाही यासाठी तो समाधानीही होता.