सलमान खानसोबत जोडलं जातंय या एडल्ट कन्टेंट क्रिएटरचं नाव; काय आहे प्रकरण जाणून घ्या

सध्या सलमान खान एका कारणामुळे चर्चेत आला आहे. आणि यामागचं कारण म्हणजे त्याचं नाव एडल्ट स्टारसोबत जोडलं जात आहे. 

Updated: Oct 8, 2023, 04:17 PM IST
सलमान खानसोबत जोडलं जातंय या एडल्ट कन्टेंट क्रिएटरचं नाव; काय आहे प्रकरण जाणून घ्या

मुंबई : सलमान खान हा बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे. कायमच तो त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो.  पुन्हा एकदा अभिनेता छोट्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. लवकरच अभिनेत्याचा रिअॅलिटी शो 'बिग बॉस सीझन 17' 15 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. रविवारी त्याचा प्रीमियर होणार असून त्याआधी या शोच्या स्पर्धकांची नावांची जोरदार चर्चा होत आहे. यातलीच काही नावे समोर आली आहेत. मात्र, त्याला अद्याप तरी कोणीही दुजोरा दिलेला नाही. पण समोर येणाऱ्या अहवालांमध्ये दावे नक्कीच केले जात आहेत. अशा परिस्थितीत आता या यादीत अॅडल्ट कंटेंट क्रिएटर शिल्पा सेठीचं नावही सामील झालं आहे.

Add Zee News as a Preferred Source

'बिग बॉस सीझन 17' पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. हा शो रात्री ९ वाजता कलर्स टीव्ही आणि जिओ सिनेमावर तुम्हाला पाहता येईल. मात्र, त्यात येणार्‍या स्टार्सची चाहत्यांना उत्सुकता आहे. यावेळी ते कोणाला पाहतील हे त्यांना जाणून घ्यायला प्रेक्षक कामालीचे उत्सुक आहेत. दरम्यान, शिल्पा सेठीचं नाव समोर येत आहे, जिची तुलना सनी लिओनी आणि पामेला अँडरसन यांच्यासोबत केली जाते.  

या नावाने प्रसिद्ध
शिल्पाला भारताची किम कार्दशियन म्हटलं जातं. ती तिच्या प्लस-साइज बॉडीशेपमुळे चर्चेत असते. तिने स्वतःची वेगळी अशी शैली निर्माण केली आहे. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते आणि ती तिचे एका पाठोपाठ एक फोटो पोस्ट करत असते. लोक तिला मिस सेठी या नावाने देखील ओळखतात. तिने स्वबळावर यश मिळवून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

इंस्टाग्राम बायोमध्ये शिल्पा सेठी स्वतःला सर्वात वाईट भारतीय म्हणते. कंटेंट क्रिएटर शिल्पा, भारतात जन्मलेली, अमेरिकेत लहानाची मोठी झाली. तिने तिचा प्रवास टिक-टॉकवरून सुरू केला. तिने तिचे व्हिडीओ टिकटॉकवर बनवून ती लोकांमध्ये लोकप्रिय झाली. इन्स्टाग्रामवर तिचे 10 मिलियन फॉलोअर्स आहेत. 

About the Author