Dia Mirza च्या जवळच्या व्यक्तीचं कार अपघातात निधन

कमी वयातच Dia Mirza च्या जवळच्या व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास, फोटो पोस्ट करत अभिनेत्रीकडून भावना व्यक्त  

Updated: Aug 2, 2022, 08:54 AM IST
Dia Mirza च्या जवळच्या व्यक्तीचं कार अपघातात निधन

मुंबई : अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) च्या कुटुंबावर सध्या दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. कारण कुटुंबातील लहान व्यक्तीचं निधन झालं आहे. दिया मिर्झाची भाची आणि काँग्रेस नेते फिरोज खान यांची मुलगी तान्या काकडेचं कार आपघातात निधन झालं आहे. तान्याच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला श्रद्धांजली वाहिली आहे. दियाने देखील भाचीचा फोटो पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या दियाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

भाचीचा फोटो पोस्ट करत दियाने भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्री म्हणाली, 'माझी भाची, माझी मुलगी, माझी जान.. तू आता या जगात नाहीस. तू सध्या जिथे कुठे आहेस, त्याठिकाणी तुला शांती आणि प्रेम मिळो.... तू कायम आमच्या हृदयात राहशील.. ओम शांती...'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दिया मिर्झाच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत तिचे चाहते आणि सेलिब्रिटी अभिनेत्रीच्या भाचीला श्रद्धांजली वाहात आहेत. रिद्धिमा कपूर साहनी आणि सुनील शेट्टी, गौहर खानने सोशल मीडियावर दुःख व्यक्त केलं आहे. 

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, तान्या इतर चार मित्रांसह हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परत येत असताना अपघात झाला. ही घटना NH 44 वर घडली. त्यानंतर तान्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांना तान्याला मृत घोषित केलं.