'नवरा माझा नवसाचा'मधील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? आज पोहचलीये घराघरात

 यासिनेमात असेही काही कलाकार आहेत ज्यांनी या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

Updated: May 26, 2022, 04:26 PM IST
 'नवरा माझा नवसाचा'मधील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? आज पोहचलीये घराघरात title=

मुंबई : 'नवरा माझा नवसाचा' हा मराठी सिनेमा आज कोणाला माहित नाही. अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, याचबरोबर या सिनेमात भली मोठी स्टारकास्ट आहे. यासिनेमात असेही काही कलाकार आहेत ज्यांनी या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. आणि आज हे कलाकार सुपरहिट झाले आहेत. आज या कलाकारांना पाहिल्यावर प्रेक्षकांना विश्वास बसत नाही की, हे कलाकार तेच आहेत. 

यामधलं पहिलं नावं म्हणजे वैभव मांगले, याच क्रमात अजून एक नाव समोर येतं ते म्हणजे, आई कुठे काय करते या मालिकेतील अरुंधतीचं, आज जरी अरुधंती घराघरात पोहचली असली तरी, नवरा माझा नवसाचा या सिनेमात तिने vj कँन्डीची भूमिका साकारली होती. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. vj कँन्डीच्या भूमिकेला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या सीरियलची प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ आहे. प्रेक्षक सतत या सीरियलमधील कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. मालिकेत प्रमुख भूमिका असणारी अरुंधती अनेकांना आपलीशी वाटते. अतिशय साध्या लूकमध्ये दिसणारी अरुंधती महिलावर्गामध्ये विशेष लोकप्रिय आहे. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिनं अरुंधतीची भूमिका साकारली आहे.