नुसत्या ब्रावर वर्काऊट करणाऱ्या या अभिनेत्रीचे सोशल मीडियावर हवा

फिल्म स्टार्सची बालपणीची झलक सोशल मीडियावर व्हायरल होणं आता सामान्य झालं आहे. 

Updated: Mar 17, 2022, 08:48 PM IST
नुसत्या ब्रावर वर्काऊट करणाऱ्या या अभिनेत्रीचे सोशल मीडियावर हवा title=

मुंबई : फिल्म स्टार्सची बालपणीची झलक सोशल मीडियावर व्हायरल होणं आता सामान्य झालं आहे. स्टार्सचे फोटो पाहून ओळखण्याचं चॅलेंज तुम्ही अनेकदा पूर्ण केलं असेल, पण यावेळी मात्र एका अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जिला चित्रपटांमध्ये पाहिल्यानंतरही तिला ओळखण्याचं आव्हान सोशल मीडियावर दिलं जात आहे.

सोशल मीडियावर समोर आलेला व्हिडिओ एका अभिनेत्रीचा आहे. ज्यामध्ये अभिनेत्री जीममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे.  अभिनेत्री तिच्या फिटनेसबाबत नेहमीच खूप जागरूक असते. जर तुम्हाला अजुनही कळालं नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, ही अभिनेत्री  दुसरी तिसरी कोणी नसून बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी आहे. जी जिममध्ये पाठमोरी बसून व्यायाम करताना दिसतेय.

यादरम्यान बॅकलेस टॉप आणि पिवळी शॉर्ट्स घातलेली दिशा पटानी बेंचवर बसून बायसेप्स मारताना दिसत आहे. त्याचबरोबर, हा व्हिडिओ मागच्या बाजूने शूट करण्यात आला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर बरेच लोक तिला ओळखू शकले नाहीत. मात्र, तिच्या काही डाय हार्ट चाहत्यांनी तिला केवळ ओळखलचं नाही तर तिच्या व्यायामाचं कौतुकही केलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

टाइगरला मानते आपला फिटनेस इंस्पीरेशन
फिटनेसच्या बाबतीत, दिशा तिच्या रूमर्ड बॉयफ्रेंड टायगर श्रॉफकडून प्रेरणा घेते. दोघंही त्यांच्या डेटिंगमुळे चर्चेत असतात. अनेकदा ते एकत्र वकेशनला सुद्धा जाताना दिसतात. दोघांची सिझलिंग केमिस्ट्री अनेकदा चर्चेत रअसते. केवळ टायगरसोबतच नाही तर दिशाचे त्याच्या कुटुंबासोबतही चांगले संबंध आहेत. दिशाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच योद्धा या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे.