ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती गंभीर; रूग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रविवारी सकाळी मुंबईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Updated: Jun 6, 2021, 12:05 PM IST
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती गंभीर; रूग्णालयात दाखल

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रविवारी सकाळी मुंबईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडल्यामुळे बॉलिवूडकर आणि त्यांचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर मुंबईतील हिंदूजा रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिलीप कुमार यांच्या पत्नी अभिनेत्री सायरा बानो यांनी दिली आहे.

सायरा बानो म्हणाल्या, 'दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल केलं आहे. ज्या रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे, ते कोरोना रूग्णालय नाही. डॉ नितिन गोखले यांच्या देखरेखीखाली दिलीप कुमार यांच्यावर उपचार सुरू आहेत. तुम्ही त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करा.' असं देखील सायरा बानो म्हणाल्या.