'ओ करण जोहर के पालतू', म्हणतं कंगना आणि दिलजीतमध्ये जुंपली

पुन्हा एकदा कंगना भडकली 

Updated: Dec 3, 2020, 06:15 PM IST
'ओ करण जोहर के पालतू', म्हणतं कंगना आणि दिलजीतमध्ये जुंपली  title=

मुंबई : आपलं मत बेधडकपणे मांडण्यात कायमच अग्रेसर असलेली अभिनेत्री कंगना राणौत परत एकदा चर्चेत आली आहे. कंगनाने आता गायक आणि अभिनेता असलेल्या दिलजीत दोसांजर बोचरी टीका केली आहे. यावेळी कंगनाने सगळ्या मर्यादांच उल्लंघन केल्याचं दिसतं आहे. 

अभिनेता आणि गायक असलेल्या दिलजीत दोसांजरने कंगनावर शेतकरी आंदोलनावरून टीका केली होती. आंदोलनात सहभागी झालेल्या एका वृद्ध महिलेची कंगनाने खिल्ली उडवली होती. त्यावरून तिला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. 

यावर दिलजीतने कंगनाला भरपूर फटकारलं होतं. याचा पलटवार करताना कंगनाने सर्व मर्यादा ओलांडल्या. 'ओ करण जोहर के पालतू' म्हणतं तिने ट्विट केलं आहे. 

कंगनाला टॅग करत दिलजीतने एक ट्विट केलं होतं. दिलजीतने एक व्हिडिओ शेअर करत कंगनाला फटकारलं होतं. त्यालाच प्रत्युत्तर देत कंगनाने दिलजीतला नको ते शब्द बोलली आहे.