Dimple Kapadia Marriage With Rajesh Khanna Was Traumatic Depressive : बॉलिवूड अभिनेता राजेश खन्ना आणि डिम्पल कपाडिया यांची लेक ट्विंकल खन्नानं 1990 मध्ये चित्रपटसृष्टीत काम केलं. मात्र, काही काळानंतर ती चित्रपटसृष्टीपासून लांब झाली. आता ट्विंकल ही एक होस्ट आणि राइटर- ऑथर आहे. ट्विंकलनं तिच्या आई-वडिलांना मिळालेली लोकप्रियता पाहिली, त्यांच्यातलं प्रेम पाहिलं. त्यासोबतच तिनं आई-वडिलांना विभक्त होताना पाहिलं.
डिम्पल आणि राजेश खन्ना हे 1970 मध्ये लग्न बंधनात अडकले. राजेश खन्ना हे डिम्पल यांच्यापेक्षा वयानं खूप मोठे होते. त्यांचं लग्न जास्त काळ टिकलं नाही आणि ते दोघं 80 च्या दशकात विभक्त झाले. 2018 मध्ये करण जोहरसोबत तिच्या पुस्तकाच्या लॉन्चच्या वेळी ट्विंकलनं तिच्या आई-वडिलांच्या विभक्त होण्यावर वक्तव्य केलं. त्याशिवाय डिंपल यांनी देखील त्यांचं आणि राजेश खन्ना यांचं नातं बिघडण्यावर वक्तव्य केलं होतं.
डिंपल यांनी प्रितीश नंदीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की 'मला वाटतं की मी आणि राजेश दोघं वेगळ्या प्रकारे व्यक्ती आहेत. हे समजून घेण्यासाठी मी खूप लहान आणि तरुण होते की हा कोणत्या प्रकारचा पुरुष आहे. जी व्यक्ती सुपरस्टार राहिली आहे, त्याचं करिअर खड्ड्यात का जातयं. मला स्टार्स वगैरे विषयी तर नाही माहित आणि मानतही नाही. पण माझ्यासाठी राजेशला अशा परिस्थितीत समजून घेणं कठीम होतं.'
पुढे डिम्पल म्हणाल्या,'माझ्यासाठी राजेशसोबत राहमं कठीण झालं होतं. ते लग्न माझ्यासाठी खूप ट्रॉमॅटिक होतं. जेव्हा त्यांनी माझ्याशी लग्न केलं तेव्हा ते त्यांच्या करिअरच्या पीकवर होते. लग्नानंतर त्याचं करिअर बूडू लागलं आणि ही गोष्ट त्याला एक्सेप्ट करता येत नव्हती. त्यामुळे त्यांनी आमचं वैवाहिक आयुष्य खराब केलं. '
करण जोहरसोबत पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ट्विंकल खन्नानं सांगितलं की 'मी जे काही लिहिते, ते महिलांविषयी असतं ज्या महिला या जगात त्यांचं स्थान शोधत असतात. एक स्त्री काय आहे आणि तिनं कसं असायला हवं याविषयी असतं. कुठे ना कुठे माझ्या डोक्यात ही सिंग्युलर इमेज आहे. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आजीच्या घरी गेलो होतो. आम्ही सगळे एकाच खोलीत राहत होतो आणि मी, माझी बहीण जमिनीवर गाधी टाकून झोपायचो.'
ट्विंकलनं पुढे तिच्या आईविषयी सांगितलं की 'त्यावेळी तिची शिफ्ट 3 ची असायची. तर ती 9 वाजता घरी यायची आणि तरी सुद्धा कधी तक्रार करत नव्हते. तिच्या चेहऱ्यावर कायम हसू असायचं. माझ्यासाठी त्यावेळी एक गोष्ट स्पष्ट होती की एका महिलेला कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही भासली पाहिजे. पुरुष ठीक आहे, त्यांच्यासोबत राहणं ठीक आहे. ते एका मिठाईप्रमाणे असतात, पण मेन कोर्स नाही.'
हेही वाचा : हार्दिकला घटस्फोट देऊन महिना झाला नाही आणि प्रेमात पडली नताशा! म्हणाली...
ट्विंकलनं सांगितलं की 'हा अनुभव तिच्या संपूर्ण आयुष्याला दाखवतं, कारण तिच्याकडे हा एक वेगळा मुद्दा होता. प्रत्येकानं गाधीवरून उठून त्यांच्या आईकडे पाहायला हवं की त्यांनी इतक्या गोष्टी केल्या आहेत की त्या उंचीला पोहचणं कठीण आहे.