या अभिनेत्रीला म्हंटलं जातं नर्गिस आणि राज कपूर यांचं लव्ह चाईल्ड, स्टोरी आहे खूपच मसालेदार

पहिल्यांदाच नर्गिस यांची राज कपूर यांच्याशी झालेली भेट चित्रपटातून साकारण्यात आल्यामुळं या चर्चांच्या बातम्यांमध्ये अजून गॉसिप्सचं तेल ओतलं गेलं. 

Updated: Sep 26, 2022, 12:10 AM IST
या अभिनेत्रीला म्हंटलं जातं नर्गिस आणि राज कपूर यांचं लव्ह चाईल्ड, स्टोरी आहे खूपच मसालेदार title=

Raj Kapoor and Nargis Relation: कपूर हे आडनाव ऐकून सर्वात याआधी डोळ्यासारमोर येते ती म्हणजे भारतीय सिनेसृष्टी. बॉलिवूडमध्ये कपूर खानदानाने आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली हे वेगळं सांगायला नको. याच कपूर खानदानातील 'शो मॅन' (Show Man) म्हणून ज्यांची ओळख ते म्हणजे 'राज कपूर' (Raj Kapoor) . राज कपूर यांना अभनेत्री नर्गिस यांची कायम साथ मिळाली. या दरम्यान नर्गिस या RK बॅनर अंतर्गत रिलीज झालेल्या ( RK Studios) अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिकाही निभावताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 

कसं होतं नर्गिस आणि राज कपूर यांच्यातील नातं 

नर्गिस यांना राज कपूर यांची अनेक वर्ष साथ मिळाली. RK बॅनर अंतर्गत सिनेमांमध्ये नर्गिस झळकल्या. राज आणि नर्गिस यांचं तब्बल 8 वर्ष रिलेशनशिप देखील होतं. मात्र राज कपूर आपल्याशी लग्न  करणार नाही हे समजल्यावर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. नर्गिस यांनी राज कपूर यांच्यापासून दूर जाण्याचा टोकाचा निर्णय घेतला. अशात नर्गिस आणि राज कपूर यांना अपत्यही असल्याच्या अनेक वावड्या उठल्या होत्या. 

नर्गिस आणि राज कपूर यांची लेक कोण? 

नर्गिस आणि राज कपूर यांच्या रिलेशनच्या त्यावेळी प्रचंड चर्चा होती. अशात डिम्पल ही नर्गिस आणि राज कपूर यांचीच मुलगी लेक आहे ( love child of Raj Kapoor and Nargis)  अशा काही बातम्याही समोर आल्या. डिम्पलचा चेहरा नर्गिस आणि राज कपूर दोघांच्या चेहऱ्याशी मिळता जुळता जुळता असल्याने चर्चांचा वणवा पसरला. पहिल्यांदाच नर्गिस यांची राज कपूर यांच्याशी झालेली भेट चित्रपटातून साकारण्यात आल्यामुळं या चर्चांच्या बातम्यांमध्ये अजून गॉसिप्सचं तेल ओतलं गेलं. 

यावर डिम्पल काय म्हणाली?

आपल्याविषयी अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांच्या विचारशक्तीची किव येते, अशी कमेंट येवेळी डिम्पल (Reaction of Dimple)  यांनी दिलेली. सोबतच, "तुम्ही मला कधी संजय दत्तची सावत्र बहिण म्हणून पाहाल तरी का?" असा विनोदही त्यावेळी त्यांनी केलेला.  

या सर्व घटनांवर स्वतः नर्गिस यांनीही प्रतिक्रिया दिलेली. डिम्पल माझी लेक असती तर मी तिला वाऱ्यावर सोडलं नसतं, असं नर्गिस यांनी म्हंटलेलं. 

dimple kapadia was the love child of Raj Kapoor and Nargis fact check