...कधीच परत येणार नाही; काळजावर दगड ठेवत करण जोहरचा मोठा निर्णय

आता हाच करण मात्र अशा एका वळणावर आला आहे, जिथं त्याला सर्वात मोठा आणि तितकाच वेदनादायी निर्णय घ्यावा लागला आहे.   

Updated: May 4, 2022, 12:24 PM IST
...कधीच परत येणार नाही; काळजावर दगड ठेवत करण जोहरचा मोठा निर्णय  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : निर्माता दिग्दर्शक करण जोहर यानं फार कमी वयापासूनच कला जगतामध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. सहाय्यकक दिग्दर्शक, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता अशा बहुविध रुपांमध्ये तो बॉलिवूडमध्ये वावरत राहिला आणि पाहता पाहता त्याला अपेक्षित यश मिळत गेलं. 

बऱ्याच कलाकारांच्या यशामध्ये करणचाही हात आहे. मुख्य म्हणजे स्वत:लाच आव्हानं देत करण नव्यानं काही गोष्टींमध्ये नशीब आजमावतानाही दिसला. आता हाच करण मात्र अशा एका वळणावर आला आहे, जिथं त्याला सर्वात मोठा आणि तितकाच वेदनादायी निर्णय घ्यावा लागला आहे. (Karan Johar)

सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यानं हा निर्णय सर्वांना सांगितला. काळजावर दगड ठेवत आपल्याला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं त्यानं स्पष्ट केलं. 

काय म्हणाला करण? 
इन्स्टाग्रामवर एकत पोस्ट लिहित करण म्हणाला, 'कॉफी विथ करण हा कार्यक्रम माझ्या आणि तुमच्या आयुष्यात आतापर्यंत सहा पर्वांपर्यंतचा सोबती होता', असं म्हणत त्यानं भूतकाळापासूनच आपल्या शब्दांची सुरुवात केली. 

या कार्यक्रमाचे परिणाम नेमके कसे होते हे सांगताना अतिशय जड अंतकरणानं आपण हे स्पष्ट करत आहोत की, Koffee With Karan हा चॅट शो कधीच परत येणार नाही. 

करणनं जशी ही पोस्ट केली आणि ती नेटकऱ्यांच्या नजरेत आली, तसं लगेचच अनेकांनीटच नाराजीचा सूर आळवला. तू असं काय करतोयंस.... असे प्रश्नही अनेकांनीच त्याला विचारले. काहींनी तर हा कलाजगतातील एका पर्वाचा अंत असल्याचंही म्हटलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

नेटकऱ्यांच्या या प्रतिक्रिया पाहता, या कार्यक्रमाची लोकप्रियता नेमकी किती होती याचा अगदी सहज अंदाज लावता येत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच करणच्या या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची चर्चा पाहायला मिळाली होती. 

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट या शोच्या नव्या पर्वातील पहिलेच पाहुणे असल्याचं म्हटलं गेलं होतं. पण, आता मात्र हा कार्यक्रमच प्रेक्षकांच्या भेटीला येणार नसल्यामुळं चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.