'दिग्दर्शक माझी खूप स्तुती करायचे पण...', दिल्ली क्राईमनंतर शेफाली शाहचा मोठा खुलासा

शेफाली शाह ही चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे 

Updated: Sep 4, 2022, 08:12 PM IST
'दिग्दर्शक माझी खूप स्तुती करायचे पण...',  दिल्ली क्राईमनंतर शेफाली शाहचा मोठा खुलासा title=

मुंबई : शेफाली शाह ही चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे यात काहीच शंका नाही. पण असं असूनही दिग्दर्शकाने तिला कास्ट केलं नाही. हा खुलासा खुद्द अभिनेत्रीने केला आहे. शेफाली सध्या 'दिल्ली क्राइम सीझन 2' मध्ये दिसत आहे. दरम्यान, अभिनेत्रीने खुलासा केला आहे की, दिग्दर्शक तिच्या कामाचं खूप कौतुक करायचे पण तिला कधी कास्ट करायचे नाही.

एका केलेल्या संभाषणात शेफाली म्हणाली, "मला असं वाटतं की, 'दिल्ली क्राईम' करण्यापूर्वी माझी क्षमता कोणीही योग्यरित्या ओळखली नव्हती. मला नेहमीच खूप प्रेम आणि कौतुक मिळालं. पण ते कामात बदलत नव्हते. अभिनेत्री म्हणाली, 'दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते म्हणायचे की, मी एक उत्तम अभिनेत्री आहे. पण मला काम मिळत नव्हतं. असं नव्हतं की, मला कास्ट करत नव्हते किंवा माझी भूमिका करत होता असं नाही.

"याला बराच वेळ लागला आहे. मात्र आज मी जिथे आहे तिथे मी खूप खुश आहे. त्याला हिंदीत म्हणतात, "देर आये दुरस्त आए. मला खूप आनंद होत आहे की मला जे काम करायचं होतं ते काम शेवटी मला मिळत आहे."