हे काय! दिशा पटानीच्या बॉयफ्रेंडनं केलेलं कृत्य पाहून नेटकरी हैराण

Disha Patani : दिशा पटानीचा कथित बॉयफ्रेंड अलेक्झांडर ऍक्टिव्ह हा नेहमीच तिच्यासोबत अनेक ठिकाणी स्पॉट होत असतो. दरम्यान, त्यानं आता असं काही केलं आहे की जे पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 20, 2023, 02:00 PM IST
हे काय! दिशा पटानीच्या बॉयफ्रेंडनं केलेलं कृत्य पाहून नेटकरी हैराण title=
(Photo Credit : Social Media)

Disha Patani : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी ही सतत तिच्या आणि टायगर श्रॉफच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. पण टायगरनं काही दिवसांपूर्वी खुलासा केला होता की तो गेल्या दोन वर्षांपासून सिंगल आहे. तर दुसरीकडे दिशा तिचा रुमर्ड बॉयफ्रेंड अलेक्झांडर ऍक्टिव्हला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. ते दोघं सतत एकमेकांसोबत दिसतात. त्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्यात दिशाच्या कथित बॉयफ्रेंड अलेक्झांडर ऍक्टिव्हनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून सगळीकडे चर्चा सुरु आहे की तो त्याच्या लेडी लव्हसाठी काय काय करतोय. तर अनेकांनी खरंच ही मैत्री आहे की प्रेम असे सवाल केले आहेत. 

हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर फिल्मी ग्याननं बॉलिवूडनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ दिशाचा एक्स बॉयफ्रेंड टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत दिशा तिचा कथित बॉयफ्रेंड अलेक्झांडर ऍक्टिव्ह आणि कृष्णा दिसत आहे. कृष्णा हा व्हिडीओ शूट करत असताना ती अलेक्झांडर ऍक्टिव्हच्या टॅट्यूकडे फोकस करत दाखवताना दिसते. यावर ती अलेक्झांडर ऍक्टिव्हला विचारते की कोण आहे ही? त्यावर उत्तर देत अलेक्झांडर ऍक्टिव्ह म्हणतो माहित नाही. पण अलेक्झांडर ऍक्टिव्हनं काढलेल्या टॅट्यूमध्ये अनेकांना दिशाचा चेहरा दिसला आहे. दिशा आणि अलेक्झांडर ऍक्टिव्हनं त्यांचं रिलेशनशिप लपवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते त्यांचं नातं सगळ्यांपासून लपवू शकत नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : Gadar 2 नं 300 कोटी कमावूनही सनी देओलला कर्ज फेडता येईना! मुंबईतील घरावर आली जप्तीची वेळ

खरंतर दिशा आणि अलेक्झांडर ऍक्टिव्हचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. दिशा आणि अलेक्झांडर ऍक्टिव्हचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी मिश्कील कमेंट करत म्हणाला, 'टायगरची बहीण कृष्णा त्यांच्यासोबत आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'आधी मित्र आणि आता अचानक बॉयफ्रेंड झाला.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'टायगर बोलत असेल मी माझ्या पूर्ण बॉडीवर टॅट्यू काढलं असतं.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'टायगर एका कोपऱ्यात बसून रडत असेल.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तू त्याच्यासोबत का आहेस?' तिसरा नेटकरी म्हणतो, 'बापरे त्यानं दिशाचं टॅट्यू काढला आहे.'