दिशा पटानीसोबत तो मुलगा कोण? युझर्स म्हणाले 'टायगर जिंदा है...'

टायगरला सोडून दिशासोबत नक्की आहे तरी कोण??

Updated: Aug 9, 2021, 11:55 AM IST
दिशा पटानीसोबत तो मुलगा कोण? युझर्स म्हणाले 'टायगर जिंदा है...' title=

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि नॅशनल क्रश दिशा पटानी कायम चर्चत असते. दिशा सोशल मीडियावर देखील ऍक्टिव्ह असते.  एवढंच नाही तर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावरील  दिशाचे फोटो, तिचा डान्स आणि फिटनेस व्हिडिओ चाहत्यांना घायाळ करत असतात. पण आता सोशल मीडियावरील दिशाच्या एका फोटोने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. 

फोटोमध्ये दिशा तिच्या एका मित्रासोबत दिसत आहे. दिशाने यापूर्वी देखील याच मित्रासोबत फोटो पोस्ट केले होते. फोटोमध्ये असलेला मुलगा दिशाचा बेस्टफ्रेन्ड असल्याचं समजत आहे. फोटोमध्ये दिशा आणि तिचा मित्र अत्यंत ग्लॅमरस दिसत आहे. सध्या दिशाचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दिशा आणि तिच्या मित्रासोबत असलेला फोटो फिल्मी ज्ञान नावाच्या एकाऑफिशियल इंस्टाग्राम पेजवरून शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोवर युझर्सच्या कमेन्टचा वर्षाव होत आहे. एका चाहत्याने कमेन्टमध्ये 'अब तो टाइगर को जलन होगी' असं लिहिलं आहे, तर दुसऱ्या युझरने  'टायगर जिंदा है...' असं लिहिलं आहे. 

सांगायचं झालं तर दिशा अभिनेता टायगर श्रॉफला डेट करत आहे. ते दोघे  कायम एकमेकांसोबत दिसतात. दिशा अखेर अभिनेता सलमान स्टारर 'राधे' चित्रपटात झळकली होती. चित्रपटाला हवी तेवढी पसंती मिळाली नाही, पण दिशाच्या अभिनयाचं कौतुक झालं.