Disha Salian चा शेवटचा व्हिडिओ, पार्टीत सहभागी होते फक्त जवळचे मित्र

समोर आला धक्कादायक व्हिडिओ 

Updated: Aug 9, 2020, 07:56 AM IST
Disha Salian चा शेवटचा व्हिडिओ, पार्टीत सहभागी होते फक्त जवळचे मित्र  title=

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियानने ८ जून रोजी बिल्डींगबधून उडी मारत आत्महत्या केली. तर १४ जून रोजी सुशांतने त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा या दोघांच्या आत्महत्येचा एकमेकांशी संबंध असल्याची शक्यता वर्तवत तपास सुरू केला आहे. 

दिशाने ८ जून रोजी मुंबईतील हाय-राइज अपार्टमेंटमधून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी ती एका पार्टीत सहभागी झाली होती. या पार्टीचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्या पार्टीत तिने आपल्या मित्र-परिवारासोबत खूप एन्जॉय केलं होतं. पार्टी तिच्या मित्राच्या घरी होती आणि पार्टीनंतर तात्काळ तिची आत्महत्या झाल्याचं उघडकीस आली होती. 

दिशाच्या या व्हिडिओच खूप जवळचे मित्र आहेत. तसेच या व्हिडिओत ती अतिशय आनंदी दिसत आहे. हृतिकच्या 'मिशन कश्मीर' सिनेमातील 'रिन्द पोशमाल' या गाड्यावर डान्स करत आहे. ६ ऑगस्ट रोजी मुंबई पोलिसांचे डीसीपी विशाल ठाकूर यांनी सांगितलं की, ते दिशाच्या आणखी एका रिपोर्टची वाट पाहतात. 

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याला कारण देखील तसचं आहे. अंकिताने सुशांतच्या आईसोबत एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. सुशांतच्या आत्महत्येनंतर बऱ्याच दिवसांनंतर ती पुन्हा आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसत आहे. सध्या अंकिताने सुशांतच्या आईसोबत शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.