'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दयाबेन पुन्हा दिसणार? निर्माते असित मोदींनी केला मोठा खुलासा

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्री दिशा वकानी पुन्हा मालिकेत दिसणार का? याबाबत खुलासा केला आहे.

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 2, 2025, 06:04 PM IST
'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दयाबेन पुन्हा दिसणार? निर्माते असित मोदींनी केला मोठा खुलासा title=

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : सब टीव्हीचा लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. ही मालिका 2008 मध्ये सुरू झाली होती. ज्यामध्ये अभिनेता दिलीप जोशी आणि दिशा वकानी यांची जोडी मुख्य भूमिकेत होती आणि ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. मात्र, दिशा वकानी, शैलेश लोढ़ा आणि नेहा मेहतासह काही कलाकारांनी ही मालिका सोडली आहे. गेल्या वर्षी पलक सिधवानी आणि जेनिफर मिस्त्री यांनी मालिका सोडली आणि निर्माता असित मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपानंतर मालिकेच्या टीआरपीवर मोठा परिणाम झाला होता. 

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत दयाबेनच्या भूमिकेला सर्वाधिक पसंती मिळाली होती. मात्र आता ही व्यक्तिरेखा बऱ्याच दिवसांपासून मालिकेमधून गायब आहे. अशातच आता या मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी दिशा वकानी मालिकेमध्ये परत येणार की नाही? याबाबत खुलासा केला आहे. 
  
दिशा वकानी मालिकेमध्ये परत येणार की नाही?

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दयाबेनची भूमिका साकारणाऱ्या दिशा वकानी या मालिकेत कधीच परतणार नाहीत. 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीने 2017 मध्ये मॅटर्निटी ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती मालिकेत परतली नाहीये. मात्र, प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून या शोमध्ये दयाबेनची वाट पाहत आहेत. 

अशातच आता मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आता दिशा वकानी मालिकेमध्ये परत येणार नाही. ते पुढे म्हणाले की, दयाबेन यांचं परतणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण मी तिला मिस करत आहे. मी दिशाला परत आणण्याचा खूप प्रयत्न केला पण ती परत येऊ शकली नाही कारण तिला आता दोन मुले आहेत. ती माझ्या बहिणीसारखी आहे. आजही आमचे कुटुंब तिच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. 

मालिकेत नवीन दयाबेनची एन्ट्री? 

असित मोदी म्हणाले की, जर दिशा वकानी मालिकेत परत आली तर खूप चांगले होईल. जर असे नाही झाले तर दयाबेनची भूमिका साकारण्यासाठी दुसऱ्या अभिनेत्रीचा शोध घ्यावा लागेल.