अथिया शेट्टीने चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा; शेअर केला बेबी बंपचा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी लवकरच आई होणार आहे. नववर्षाच्या शुभेच्छांसोबत तिने बेबी बंप फ्लॉंट करताचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये तिचा पती म्हणजेचं भारतीय क्रिकेटर केएल राहुल देखील तिच्या सोबत आहे. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. 

- | Updated: Jan 2, 2025, 04:50 PM IST
अथिया शेट्टीने चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा; शेअर केला बेबी बंपचा फोटो title=

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचे 2023 मध्ये खूप साध्या आणि खास स्वरूपात खंडाळ्यात लग्न झाले होते. त्यांच्या घरात लवकरच चिमुकल्याचे आगमन होणार आहे. ज्यामुळे सुनील शेट्टी आजोबा होणार आहे. 8 नोव्हेंबर 2024 रोजी अथियाने आणि राहुलने त्यांच्या प्रेग्नेंसीची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. नववर्षाच्या निमित्ताने, अथिया शेट्टीने बेबी बंप फ्लॉंट करत एक सुंदर पोस्ट शेअर केली, ज्यात तिने '2025 मी तुझ्याकडे मोठ्या उत्कंठेने पाहत आहे' असे म्हटले. 

अथिया शेट्टीच्या या पोस्टमध्ये एक सुंदर संदेश देखील होता, ज्यात तिने लिहिले, 'जीवनाचा वेग थोडा कमी करा, थांबा आणि इतरांच्या आशीर्वादांचा विचार करा, तुमच्या हृदयाचे ऐका आणि नंतर नवीन सुरुवातीवर विश्वास ठेवा.' या पोस्टमधून ती 2025 सालासाठी अत्यंत उत्साही आहे.

सध्या अथिया शेट्टी ऑस्ट्रेलियात आहे. जिथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी क्रिकेट खेळले जात आहे. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी ती स्टेडियममध्ये पोहोचली होती. अथिया शेट्टीने तिच्या सोशल मीडियावर कॅप्शन दिले की, 'प्रत्येक गोष्टीला वेळ देणे महत्त्वाचे आहे आणि जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे आवश्यक आहे.'  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अथिया शेट्टीचे चित्रपट 
अथिया शेट्टीने 2015 मध्ये सूरज पंचोलीसोबत 'हीरो' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकला नाही. परंतु अथिया आणि सूरज यांची केमिस्ट्री प्रेक्षकांनी आवडली होती. त्यानंतर, 'मुबारकान' आणि 'मोतीचूर चकनाचूर' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाची दखल घेण्यात आली. 

हे ही वाचा: https://zeenews.india.com/marathi/entertainment/harshali-malhotras-power...

'मोतीचूर चकनाचूर' या चित्रपटात तिच्या भूमिकेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात ती नवाजुद्दीन सिद्दीकीच्या विरोधात मुख्य भूमिका साकारत होती. लग्नानंतर अथिया शेट्टी चित्रपटसृष्टीपासून लांब राहीली आणि तिच्या कुटुंबासोबत आपला वेळ घालवतेय. अथिया शेट्टीचा आणि केएल राहुलची प्रेमकथा खूप खास आहे. 2019 मध्ये एका कॉमन मित्राद्वारे दोघांची भेट झाली होती आणि त्यानंतर त्यांचं नातं अधिक मजबूत झाले. 2023 मध्ये त्यांनी लहान विवाह सोहळ्याद्वारे आपली नवी सुरूवात केली. 

अथिया आणि केएल राहुलच्या जोडीला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यांचे सोशल मीडियावर असलेले प्रेमळ पोस्ट्स आणि त्यांच्या जीवनातील गोड क्षणांचे सोशल मीडीयावरच्या पास्ट अनेकांना प्रेरणा देत आहे.