आता कोण म्हणणार 'हे माँ...माताजी'

कोण साकारणार

आता कोण म्हणणार 'हे माँ...माताजी'

मुंबई : काही दिवसांपूर्वी आलेल्या बातमीनुसार,'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील दयाबेन म्हणजे दिशा वाकानी कमबॅक करणार आहे. पण आता आलेल्या माहितीनुसार तारक मेहताच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दिशा वाकानी शोमध्ये कमबॅक करणार नाही. यामागचं कारण म्हणजे तिचा नवरा. दिशा वाकानीचे नवऱ्याला तिने पुन्हा स्क्रिनवर वापसी करावी असं वाटत नाही. 

'तारक मेहता का उल्टा चष्मा'या मालिकेतील दयाबेनचं कॅरेक्टर दिशा वाकानी करत होती. तर दिलीप जोशी जेठालालची भूमिका साकारत होते. गेल्यावर्षीपासून दयाबेन या शोपासून दूर आहे. तिचे चाहते अनेक दिवसांपासून दयाबेनची वाट पाहत आहेत. मात्र आता ती या मालिकेत दिसणार नाही. 

दिशाने 30 नोव्हेंबर 2017 रोजी मुलीला जन्म दिला. तेव्हापासून ती आपल्या मुलीसोबत वेळ घालवत आहे. शोमध्ये अनेक चाहते आणि स्टार्स तिची आतुरतेने वाट पाहत आहेत. दिशाने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात शेवटचं शुट केलं आहे. 2008 ते आतापर्यंत ती या मालिकेत काम करत होती.