मुंबई : बिग बॉस ओटीटीची विजेती दिव्या अग्रवालने वरुण सूदसोबतचं नातं संपवलं आहे, याबाबतची माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना दिली आहे.
दिव्याने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर करून तिची बाजू मांडली आहे. ती आणि वरुण नेहमीच चांगले मित्र राहतील असेही सांगितले आहे.
दिव्या अग्रवालने पोस्ट शेअर करत लिहिले - "आयुष्य हे सर्कससारखे आहे. माझ्यासोबत जे काही होत आहे त्यासाठी मी कोणाला दोषी ठरवत नाही. मला वाटतं आता सर्व संपलं आहे आणि ते ठीक आहे.. मला श्वास घ्यायचा आहे आणि माझ्यासाठी जगायचं आहे.मी याद्वारे औपचारिकपणे घोषित करते की मी स्वत:च माझ्यासाठी उभी राहिले आहे आणि मला माझे जीवन माझ्या पद्धतीने जगण्यासाठी वेळ देण्याची गरज वाटते आहे. रिलेशनशीपमधून बाहेर पडणे ही माझी निवड आहे."
पुढे अभिनेत्रीने लिंहिलं आहे की, "त्याच्यासोबत घालवलेले सर्व आनंदाचे क्षण मला खूप आवडतात. तो चांगला मुलगा आहे ! तो नेहमीच माझा चांगला मित्र असेल. माझ्या निर्णयाचा आदर करावा." असं कॅप्शनमध्ये लिहित तिने एक फोटो देखील पोस्ट केला आहे.