मुंबई : तुम्ही नेहमीचं सोशल मीडियावर celebrities ना वेगवेगळ्या कारणांसाठी ट्रोल होताना पाहिले असणार, काही एक्ट्रेस सोशल मीडियावरती त्यांच्या बोल्ड फोटोशूटसाठीही ट्रोल होतात, पण आता ट्रोलर्सने निशाना साधला आहे तो दिव्या अग्रवालवर.
दिव्याने तीच्या सोशल मीडियासाठी कॅान्सेपट फोटोशूट्स केलं होतं, पण ट्रोलर्सनी दिव्याच्या या लूकला जास्त पसंती दिली नाही आणि दिव्यावर सोशल मीडियावरती खोचक comments यायला लागले. दिव्याने त्यावर नुकत्याचं दिलेल्या एका interview मध्ये तिचे मत व्यक्तं केले.
E-times मध्ये दिलेल्या एका interview मध्ये दिव्याने सांगितले की, ती या सगळ्या गोष्टींबाबत जास्त विचार करत नाही, मी या देखील गोष्टीचा विचार करत नाही की, मी कोणता फोटो सोशल मीडियावर शेअर करु.
मी फक्तं एक expriment म्हणून हा फोटो शूट केला होता आणि तो ही माझ्या personal इंस्टाग्रामवर अकाउंटसाठी. 2020 मध्ये मी घरीचं बसले होते आणि खूप वाईट परिस्तिथीलाही मी सामोरे गेले आहे. या सर्व काळामध्ये मी काहीतरी नवीन करण्याचा निश्चंय केला. जे मी या आधी कधीचं केले नव्हते, असे काहीतरी मला करायचे होते.
"माझा इंन्टेंशन कधीचं बॉडी शोऑफ करायचं नव्हता, मी फक्तं ट्रेन्डंस फॅालो करत होते, बस या पेक्षा जास्तं काही नाही. लोकांना असं वाटतंय की माझ्याकडे इंडस्ट्रीमध्ये जास्तं काम नाही, म्हणून मी पॉप्युलॅरिटी वाढवण्यासाठी हे सगळं करतेय, तर असं काहीही नाही. मी कधीही आशा गोष्टींनी खत-पाणी घालत नाही. लोकांनी याबद्दलचा दृष्टिकोण बदलावा, " असे दिव्या म्हणाली.