'माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमी खातो' ओळखलं का या अभिनेत्याला?

सध्या सोशल मीडियावर एक ट्रेण्ड सुरु आहे. या ट्रेण्डमध्ये सेलिब्रिटीच्या लहानपणीचे फोटो समोर येत आहेत आणि त्यांना ओळखण्याचं चॅलेंजही दिलं जात आहे. अशातच आता एका अभिनेत्याचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आणि खरंतर आज या अभिनेत्याचा वाढदिवसही आहे. 

Updated: Aug 17, 2023, 03:51 PM IST
'माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमी खातो' ओळखलं का या अभिनेत्याला? title=

मुंबई : सध्या सोशल मीडियावर एक ट्रेण्ड सुरु आहे. या ट्रेण्डमध्ये सेलिब्रिटीच्या लहानपणीचे फोटो समोर येत आहेत आणि त्यांना ओळखण्याचं चॅलेंजही दिलं जात आहे. अशातच आता एका अभिनेत्याचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आणि खरंतर आज या अभिनेत्याचा वाढदिवसही आहे. एकेकाळी मराठी सिनेसृष्टी या अभिनेत्याने गाजवली होती. मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्टीवरही या अभिनेत्याचा दबदबा होता. याचबरोबर या अभिनेत्याची पत्नीही मराठी सिनेसृष्टीत सक्रिय आहे. आता तरी तुम्ही या अभिनेत्याला ओळखलं का?

अशी ही बनवा बनवी, नवरा माझा नवसाचा, एकुलती एक, नवरी मिळे नवऱ्याला,  याचबरोबर शोले, नदीया के पार अशा अनेक सिनेमात हा अभिनेता झळकला आहे. याचबरोबर अनेक गाणीही या अभिनेत्याने गायली आहेत. याचबरोबर त्यांना महागुरुम्हणून ओळखलं जातं. आता तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की हा अभिनेता आहे तरी कोण? आणि अजूनही तुम्ही या अभिनेत्याला ओळखलं नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, हा अभिनेता दूसरा दिसरा कोणी नसून जेष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आहेत. 

सचिन पिळगावकर यांनी मराठी तसंच हिंदी सिनेसृष्टीत एक काळ तुफान गाजवला. मराठीमध्ये त्यांनी केलेलं काम, त्यांच्या चित्रपटांनी रसिकांच्या मनात कायमचं घर केलं. सचिन पिळगावकर यांनी बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केल्यानंतर त्यांचा आतापर्यंतच्या इंडस्ट्रीतील प्रवासाचा पल्ला अतिशय मोठा आहे. अभिनेते, दिग्दर्शन, गायन, मराठी हिंदी मालिका, तसंच सिनेमा अशा अनेक माध्यमांतून त्यांनी मोठं काम केलंय.

नुकतंच हे कुटूंब मालदिवला गेलं होतं. यावेळचे अनेक फोटो  सचिन यांनी त्यांचा सोशल मीडियावर शेअर केले होते. फोटो शेअर केल्यानंतर अनेक चाहत्यांनी त्यांच्या फोटोवर कमेंट करत आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.  सचिन यांच्या पत्नी सुप्रिया पिळगावकर यांनीही सिनेसृष्टीत मोलाचं योगदान दिलं असून त्यांची लेक श्रिया पिळगावकरने काही वर्षांपूर्वीच याच क्षेत्रात एन्ट्री केली आहे.  एकुलती एक या सिनेमातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

 सचिन यांनी आत्ता पर्यंत शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये आणि काही टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. सचिन यांचा जन्म १९५७ रोजी मुंबई येथे झाला. वयाच्या चौथ्या वर्षी त्यांनी 'हा माझा मार्ग एकला' या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करत अभिनयाच्या दुनियेत पदार्पण केलं. त्यानंतर सचिन यांना मराठी चित्रपटसृष्टीत सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार देण्यात आला होता.