डॉ.गुलाटी बनला सिंगर, गायले 'बिल्ला शराबी'

प्रसिद्ध कॉमेडिअन सुनील ग्रोवरने ट्विटरवर आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'बिल्ला शराबी' असे या व्हिडिओचे नाव आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 25, 2017, 07:54 PM IST
डॉ.गुलाटी बनला सिंगर, गायले 'बिल्ला शराबी' title=

नवी दिल्ली : कपिल शर्मा शो मध्ये कपिलसोबत दिसणाऱ्या 'डॉक्टर गुलाटी'ने आपले प्रोफेशन बदलल्याचे दिसत आहे. आता तो कॉमेडियनचा गायक झाला आहे. प्रसिद्ध कॉमेडिअन सुनील ग्रोवरने ट्विटरवर आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'बिल्ला शराबी' असे या व्हिडिओचे नाव आहे. बिल्ला शराबीचा हा प्रोमो असून २६ सप्टेंबरला हा रिलीज होणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे. 

यामध्ये आवाज माझा असून अमित त्रिवेदी हे म्यूजिक डिरेक्टर असल्याचे त्याने ट्विट केले आहे.

 तुम्ही जादूगार आहात. तुमच्यासोबत काम करण्याचा मान मिळाला असेही त्याने त्रिवेदी यांना उद्देशून म्हटले आहे. दरम्यान संगीतकार अमित त्रिवेदी यांनी या ट्विटचे उत्तर देण्यास उशिर केला नाही. ते म्हणाले, "सुनील ग्रोव्हर तुझ्यासोबत काम करणंही खूप मजेदार होतं. सुनील ग्रोव्हर तू अलौकिक आहेस. "

सुनील ग्रोव्हरने गाणे गाण्याची ही दुसरी वेळ आहे.  यापूर्वी त्याचे ‘मेरे हज्बैंड मुझको प्यार नहीं करते’हे गाणे हिट ठरले होते. याप्रकारे हे दुसरे गाणे देखील धमाकेदार असेल अशी आशा आहे.