डोजा कॅटची होतेय 'छोटा पंडित'शी तुलना; फोटो पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू...

सेलेब्स काहीही परिधान करतात, तो एक ट्रेंड बनतो. जरी तो ट्रेंड बनला नाही तरी तो चर्चेचा विषय नक्कीच बनतो. 

Updated: Jan 26, 2023, 07:50 PM IST
डोजा कॅटची होतेय 'छोटा पंडित'शी तुलना; फोटो पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू...

मुंबई : फॅशनचा विचार केला तर आजची फॅशन ही एलियन असल्याचं भासवतं यामागे एक कारण आहे. सेलेब्स काहीही परिधान करतात, तो एक ट्रेंड बनतो. जरी तो ट्रेंड बनला नाही तरी तो चर्चेचा विषय नक्कीच बनतो. अलीकडेच हॉलिवूडची लोकप्रिय गायिका आणि रॅपर डोजा कॅटने फॅशनच्या नावाखाली सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तिचा लूक पाहता ती माणूस कमी आणि लाल सरडा दिसत असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. अशा परिस्थितीत जेव्हा तिचे फोटो सातासमुद्रापार जाऊन भारतात पोहोचलं, तेव्हा कळलं की, आयकॉनिक स्टायलिश स्टार राजपाल यादवचा लूक कॉपी करण्यात आला आहे.

भूलभुलैयामधील छोटा पंडित तुम्हावा आठवत असेलच. संपूर्ण चित्रपटात तरुण पंडित स्वतःला लाल सिंदूर लावल्याचं दिसला होता. पॅरिस फॅशन वीकमधील डोजा कॅटच्या लूकची तुलना राजपाल यादवच्या छोटे पंडितच्या लूकशी केली जात आहे. त्यातही मीम्सचा प्रचंड पूर आला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

डोजा कॅटवर गुन्हा दाखल होणार का?
डोजा कॅट आणि छोटे पंडित यांचे व्हिडिओ एकत्र करणारा एक कोलाज शेअर केला जात आहे. एका युजर्सने छोटे पंडितने डोजा कॅटवर गुन्हा दाखल करावा, अशी कमेंट केली आहे. तर दुसरीकडे एका, यूजर्सने डोजा कॅटच्या या लूकला छोटे पंडितच्या लुकची स्वस्त कॉपी म्हटलं आहे. सध्या छोटे पंडित या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहेत. सगळीकडे फक्त त्याचीच चर्चा होत आहे