मुंबई : झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीची. या मालिकेत संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महत्वाच्या घडामोडी दाखवण्यात आल्या आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यातील नातं या मालिकेत अधोरेखित झालं आहे.
नुकतंच या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच निधन दाखवण्यात आलं आहे. मालिकेतील या एपिसोडमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. बाप - लेकाचं हे अतुट नातं सर्वांच्या मनात घर करून गेलं.
उत्तम कथानक आणि कलाकारांचं सर्वोत्तम अभिनय यामुळे मालिकेनं लोकप्रियतेचं शिखर गाठलंय. या मालिकेच्या सेटला सामाजिक कार्यकर्ते डॉ प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी आमटे दाम्पत्य ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेच्या संपूर्ण टीमला भेटले.