Ajay Devgn च्या एकूण संपत्तीत प्रायव्हेट जेट पासून या गोष्टीं, रक्कम ऐकून व्हाल थक्क

Ajay Devgn चा नुकताच 'दृश्यम 2' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट सगळ्यांच्या पसंतीस उतरला असून एकावर एक रेकॉर्ड ब्रेक करत आहे.   

Updated: Dec 8, 2022, 05:23 PM IST
Ajay Devgn च्या एकूण संपत्तीत प्रायव्हेट जेट पासून या गोष्टीं, रक्कम ऐकून व्हाल थक्क title=

Ajay Devgn Net Worth : अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) 'दृश्यम 2' ( Drishyam 2 ) चित्रपटाची प्रेक्षक प्रतिक्षा करत होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या चित्रपटाचा पहिला भाग 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. सस्पेन्स थ्रिलर पटकथा असलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. 7 वर्षांनंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन हे अभिषेक पाठक यांनी केलं आहे. त्यानंतर अजय विषयी इंटरनेटवर अनेक गोष्टी सर्च करण्यात येत आहेत. त्यात त्या दोघांची नेटवर्थ किती आहे हे देखील सोशल मीडियावर सर्च करण्यात येत आहे. चला तर जाणून घेऊया अजय देवगणची एकूण संपत्ती किती आहे. 

जाणून घ्या अजय देवगणची एकूण संपत्ती

रिपोर्ट्सनुसार, अजयची एकूण संपत्ती ही 30 मिलिनय डॉलर्स ते 55 मिलियन डॉलर्स म्हणजेच 244 कोटी ते 447 कोटी रुपये इतकी आहे. अजयने अनेक गोष्टींमध्ये गुंतवणुक केली आहे. महागड्या गाड्या, अॅन्डॉर्समेंट्स, हाय-एंड प्रॉपर्टी, जाहिराती आणि चित्रपटांसाठी मानधन. अजय हा बॉलिवूडमधील सर्वाधीक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अजय एका चित्रपटासाठी 60-120 कोटी रुपये मानधन घेतो. वृत्तानुसार, अजयनं नुकताच प्रदर्शित झालेला 'दृश्यम 2' साठी त्यानं अंदाजे 50 कोटी रुपये दिले. मात्र त्याला या चित्रपटासाठी किती मानधन मिळाले याचा अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अजय केवळ चित्रपटांमध्ये काम करत अभिनेता म्हणून काम करत नाही तर तो निर्माताही आहे. अजय देवगन फिल्म्स नावाचे त्याचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे, ज्याच्या बॅनरखाली त्यानं 'रनवे 34;', 'सिंघम' आणि 'टोटल धमाल' सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. याशिवाय, 2015 मध्ये, त्याने 'NY VFXWAALA' नावाने आपली VFX कंपनी देखील लॉन्च केली आहे. कंपनीनं 'बाजीराव मस्तानी', 'तमाशा', 'प्रेम रतन धन पायो' आणि 'सिम्बा' यांसारख्या चित्रपटांसाठी VFX तयार केले आहे. 

हेही वाचा : Dharmendra Birthday: धर्मेंद्र यांच्या वाढदिवसाचे हटके सेलिब्रेशन; बॉबीनं दिल खास सरप्राईज

विमल पान मसाला, व्हर्लपूल, बॅगपायपर आणि हजमोला या ब्रँड्सच्या जाहिराती करतो, त्यातूनही त्याला चांगले मानधन मिळते. अजयच्या प्रॉपर्टीमध्ये सुमारे 7 कोटी रुपयांची रॉल्स रॉयस, ऑडी ए5 स्पोर्टब्लॅक, रेंज रोव्हर वोग, मर्सिडीज एस-क्लास, ऑडी क्यू-7 या लक्झरी कार, 84 कोटी रुपयांचे खासगी जेट आणि जुहूमधील जवळपास 30 कोटी रुपयांचे शिवशक्ती घर यांचा समावेश आहे. (drishyam 2 ajay devgn total net worth from private jet to vfx company)