'या' प्रकरणी अर्जुन रामपालच्या जवळच्या व्यक्तीला गोव्यातून अटक

अर्जुन रामपालच्या जवळच्या व्यक्तीला गोव्यातून अटक करण्यात आली आहे. 

Updated: Sep 25, 2021, 04:53 PM IST
'या' प्रकरणी अर्जुन रामपालच्या जवळच्या व्यक्तीला गोव्यातून अटक

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रीएड्सच्या भावाला गोव्यातून अटक करण्यात आली आहे. Agisialos Demetriades ला संयुक्त कारवाई केल्यानंतर शनिवारी मुंबई आणि गोव्याच्या NCB ने गोव्यातून अटक केली. एएनआय या वृत्तसंस्थेच्या ट्विटनुसार, केंद्रीय एजन्सीने त्यांच्याकडून चरसही जप्त केला आहे. याआधीही एनसीबीने ऑक्टोबर 2020 मध्ये त्याला बॉलिवूड ड्रग प्रकरणात अटक केली होती. Agisialos Demetriades हा दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे.

एनसीबीने मागच्या वर्षी Agisialos Demetriades कडून चरस आणि अल्प्राझोलमच्या गोळ्याही जप्त केल्या. ड्रग पेडलर्सच्या अटकेनंतर, Agisialos Demetriades चा ड्रग व्यवहारात सहभाग असल्याचं प्रकरण समोर आलं. एनसीबीने ड्रग्स प्रकरणी गेल्या वर्षी Agisialos च्या आधी 22 लोकांना अटक केली होती.

ANI चं ट्विट.
NCBच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2020 मध्ये, Agisialos Demetriades त्याच्या आधी अटक करण्यात आलेल्या ड्रग तस्करांशी संबंधित असल्याचं आढळून आलं होतं. NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, 'अटक केलेले Agisialos Demetriades सुशांत सिंग राजपूत प्रकरणाशी संबंधित बॉलीवूड ड्रग्स प्रकरणात ड्रग पेडलर्सच्या संपर्कात होते. आरोपी थेट या प्रकरणात सामील होता, म्हणून त्याला अटक करण्यात आली.

गॅब्रिएला डेमेट्रीएड्सने जुलै 2019मध्ये अर्जुन रामपालच्या मुलाला जन्म दिला. यापूर्वी अर्जुन रामपालने माजी मिस इंडिया मेहर जेसियासोबत लग्न केलं. त्याला त्या लग्नापासून दोन मुली होत्या, ज्यांची नावं महिका आणि मायरा आहेत. 20 वर्षे एकत्र राहिल्यानंतर हे कपल एकमेकांपासून वेगळं झालं.