भर कार्यक्रमात हार्दिक जोशी ढसाढसा रडू लागला; म्हणाला 'तिच्या आठवणीत...'

झी मराठी वाहिनीवरील 'जाऊ बाई गावात' हा शो सध्या प्रत्येक घरात पाहिला जातो. अवघ्या काही वेळातच या शोने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केलं आहे. सोम - शनि, रात्री 9:30 वाजता. हा शो झी मराठी वाहिनीवर प्रसारित होतो. या शोचं सुत्रसंचालन अभिनेता हार्दिक जोशी करत आहे. 

Updated: Jan 10, 2024, 04:29 PM IST
भर कार्यक्रमात हार्दिक जोशी ढसाढसा रडू लागला; म्हणाला 'तिच्या आठवणीत...' title=

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील 'जाऊ बाई गावात' हा शो सध्या प्रत्येक घरात पाहिला जातो. अवघ्या काही वेळातच या शोने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केलं आहे. सोम - शनि, रात्री 9:30 वाजता. हा शो झी मराठी वाहिनीवर प्रसारित होतो. या शोचं सुत्रसंचालन अभिनेता हार्दिक जोशी करत आहे. मात्र या शो दरम्यान हार्दिक भावूक झाला आहे ज्याचा प्रोमो झी मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊन्टवर शेअर करण्यात आला आहे.

हार्दिक जोशी वहिनीच्या आठवणीत झाला भावूक
यावेळी हार्दिक जोशी खूप भावूक झाला.  समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेता म्हणाताना दिसत आहे की, ''मी ठरंवलंच होतं की, शो जो करेन जो फक्त आणि फक्त तिच्यासाठीच करीन. कारण की बरोबर शो ज्या दिवशी आपला ऑन एअर गेला ४ डिसेंबरला त्याच्या बरोबर एक महिना आधी आपले प्रोमो लॉन्च झाले होते शोचे. आणि त्याच्या सकाळीच कळलं मला की, असं असं होणार आहे.  मला माहिती होतं की, प्रोमो आता काही तासानंतर ऑन एअर जाणार आहेत . म्हणून मी पटकन फोन घेतला आणि फोन केला, झी च्या सगळ्या सिनीअरला फोन केला की, अशी अशी माझ्या घरात सिच्युएशन आहे. 

मी नाही करु शकत शो. तुम्ही तो प्रोमो थांबवा माझ्यामुळे तुमचं नुकसान नको. खूप वाईट कंडिशनमध्ये होती ती पण तिला कळत होतं.  ऑक्सिजन होता तोंडावरती तिच्या तिला बोलता येत नव्हतं. मला बोलवलं माझा हात हातात घेतला आणि तिने फक्त एवढंच केलं की, माझी शप्पथ आहे तुला शो सोडू नकोस. असं हावभाव करुन सांगितलं तिने.  पण नशिबाचा खेळ असा की, ती शो बघायला नव्हती. पण एक समाधान आहे की, पहिल्या एपिसोडचे फोटो तिने बघितले. त्या दिवशी दुपारीच मला कळलं की, असं असं काहीतरी होवू शकतं आणि मी रिक्वेस्ट करुन गेलो की, असं असं आहे आता, तर सकाळी साडे आठ च्या दरम्यान कळलं की, ती आता नाहीये.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ती नेहमी मला म्हणायची की, तु खूप मोठा कलाकार होणार. मोठा होईन की नाही माहित नाही. पण मी तिला नक्की प्रॉमिस करायचो दरवेळी की,मी चागंला कलाकार होवून दाखवेन नक्की तुला. आणि तिला दिलेला शब्द मी नेहमीच पुर्ण करत राहीन आणि तिला दिलाय मी शब्द की, मी माझ्या पुतणीची काळजी घेईन मी माझ्या भावाची काळजी घेईन. आजपर्यंत त्यांनी मला संभाळंल. प्रत्येक क्षणामध्ये जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. तेव्हा तिने मला सगळं दिलं.'' हार्दिकचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.