'या' मोठ्या कारणामुळे ईदला भाईजान नाही भेटू शकला चाहत्यांना; मोठं कारण समोर

रविवारी देशभरात ईदचा सण साजरा करण्यात आला.

Updated: Jul 10, 2022, 11:32 PM IST
'या' मोठ्या कारणामुळे ईदला भाईजान नाही भेटू शकला चाहत्यांना; मोठं कारण समोर title=

मुंबई : रविवारी देशभरात ईदचा सण साजरा करण्यात आला. यावेळी अनेक बॉलिवूड स्टार्सनी त्यांचे चाहते आणि जवळच्या व्यक्तींना शुभेच्छा दिल्या. चित्रपटसृष्टीतील काही स्टार्स असेही आहेत जे चाहत्यांना वेगळ्या आणि खास पद्धतीने ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी ओळखले जातात. जसं की, सलमान आणि शाहरुख खान. दोघंही प्रत्येक ईदच्या निमित्ताने त्यांच्या घराच्या बाल्कनीत येतात आणि बाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांना शुभेच्छा देतात. शाहरुख खानने आपल्या चाहत्यांशी पूर्वीप्रमाणेच संवाद साधला. त्याचबरोबर सलमान खान यावेळी ईदच्या दिवशी त्याच्या चाहत्यांना भेटला नाही.

ईदच्या निमित्ताने सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली. भाईजानच्या एका झलकसाठी चाहते मोठ्या आशेने उभे होते. पण या ईदला सलमान खान चाहत्यांना भेटला नाही. अभिनेत्याच्या चाहत्यांचा एक व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खानच्या घराबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एका रिपोर्टनुसार, सलमान खान यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव ईदच्या दिवशी चाहत्यांना भेटला नाही. अलीकडेच पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूनंतर एका टोळीने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तेव्हापासून अभिनेत्याला सुरक्षा अत्यंत कडक आहे. अशा परिस्थितीत सलमान खानच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं आहे की, सुरक्षेच्या कारणास्तव तो यावेळी ईदच्या दिवशी चाहत्यांना भेटला नाही.