राज कुंद्राच्या अटकेनंतर पत्नी शिल्पा शेट्टीची भावनिक पोस्ट, म्हणाली...

शुक्रवारी रात्री शिल्पा शेट्टी एक पोस्ट करत चाहत्यांना खास आवाहन केलं आहे.

Updated: Jul 24, 2021, 10:59 AM IST
राज कुंद्राच्या अटकेनंतर पत्नी शिल्पा शेट्टीची भावनिक पोस्ट, म्हणाली...

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला पोनोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सध्या राज 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत आहे. राज याच्यावरील गंभीर आरोपानंतर शिल्पाचं संपूर्ण कुटुंब फार दबावात आहे. शिल्पा शेट्टी सध्या टीव्ही शोमच्या शुटींगमध्येही भाग घेत नाहीये. याशिवाय तिने सोशल मीडियावरही अ‍ॅक्टिव्हिटी कमी केल्या आहेत. मात्र शुक्रवारी रात्री तिने एक पोस्ट करत चाहत्यांना खास आवाहन केलं आहे.

शिल्पाने लिहीली इमोशनल पोस्ट

शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये तिने तिचा अपकमिंग फिल्म हंगामा 2चं पोस्टर शेअर केलं आहे. यासोबत तिने एक भावनिक मेसेजही लिहिला आहे. या पोस्टमध्ये शिल्पा म्हणते, "मी योगाभ्यास आणि त्यातून मिळणाऱ्या तत्वज्ञानावर विश्वास ठेवते. आयुष्य एकाच ठिकाणी अस्तित्वात असतं आणि ते म्हणजे तुमच्या वर्तमानात."

ती पुढे म्हणते, "हंगामा 2 या सिनेमासाठी संपूर्ण टीमने मेहनत घेतलीये. हा सिनेमा चांगला बनवण्यासाठी प्रत्येक कलाकाराने मेहनत घेतलीये. कोणत्याही इतर गोष्टीचा या सिनेमावर व्हायला नको. यासाठी मी सगळ्यांना विनंती करते की या सिनेमाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीच्या मेहनतीसाठी हंगामा 2 सिनेमा पाहा. हा सिनेमा पाहताना नक्कीच तुम्हाला आनंद होईल." 

दरम्यान 19 जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावलं होतं. ही चौकशी सुमारे 2 तास चालली आणि त्यानंतर राज कुंद्राला रात्री अकरा वाजता अटक करण्यात आली. तर काल अभिनेत्री शिल्पा शेट्टीचीही कसून चौकशी करण्यात आली. राजला काल कोर्टात हजर केल्यानंतर अधिक चौकशीसाठी कोठडीत 27 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे.