राज कुंद्रा याने शमिता शेट्टी, सई ताम्हणकर यांचा केला होता विचार, या अभिनेत्रिचा गौप्यस्फोट

 पॉर्न फिल्मप्रकरणी (Pornography Case) शिल्पा शेट्टी ( Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला अटक करण्यात आल्यानंतर अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. 

Updated: Jul 24, 2021, 10:25 AM IST
राज कुंद्रा याने शमिता शेट्टी, सई ताम्हणकर यांचा केला होता विचार, या अभिनेत्रिचा गौप्यस्फोट

मुंबई :  porn case : पॉर्न फिल्मप्रकरणी (Pornography Case) शिल्पा शेट्टी ( Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला अटक करण्यात आल्यानंतर अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी 19 जुलैला पोर्नोग्राफी केस प्रकरणी अटक केली होती. राज कुंद्रा नवीन अ‍ॅपच्या तयारीत होती, अशी माहिती पुढे आली आहे. शिल्पा शेट्टी हिची बहिण शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) यांचा विचार केला होता अशी माहिती पुढे येत आहे. (Raj Kundra Soft Pornography Case)

पॉर्न फिल्मनिर्मिती आरोप प्रकरणी अटकेत असलेला राज कुंद्रा नवीन अ‍ॅप लॉन्च करण्याच्या तयारीत होता, अशी माहिती अभिनेत्री गहना वशिष्ठ हिने दिली आहे. या अ‍ॅपमध्ये चॅट शो, रिअ‍ॅलिटी शो, म्युझिक व्हिडिओ आणि फिचर फिल्म्सचा समावेश करण्यात येत होता, असेही तिने म्हटले आहे. त्यातीलच एका चित्रपटासाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीला भूमिका देण्याचा विचार होता. तर दुसऱ्या एका स्क्रिप्टसाठी मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा विचार केल्याचे गहना वशिष्ठ हिने सांगितले, असे 'नवभारत टाइम्स'ने म्हटले आहे.

'नवभारत टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत वशिष्ठ गहनाने सांगितले की, राज कुंद्रा याच्या अटकेच्या काही दिवस आधी मी त्याच्या ऑफिसमध्ये गेले होते. तेव्हा मला बॉलिफेम या अ‍ॅपविषयी समजले. हे नवीन अ‍ॅप लॉन्च करण्याचे प्लॅनिंग तो करत होता. चॅट शो, रिअ‍ॅलिटी शो, म्युझिक व्हिडिओ आणि फिचर फिल्म्सचे अ‍ॅप त्याला लॉन्च करायचे होते. यामध्ये बोल्ड दृश्ये समाविष्ट करण्याचा कुठेच त्याचा विचार नव्हता, असे तिने म्हटले आहे.

वशिष्ठ पुढे म्हणाली, फिचर फिल्म्ससाठी आम्ही स्क्रिप्टवरही चर्चा केली होती. त्यातील एका स्क्रिप्टसाठी आम्ही शमिता शेट्टीचा विचार केला तर दुसऱ्या स्क्रिप्टसाठी सई ताम्हणकर आणि दुसऱ्या कलाकारांचा विचार होता. मी या चित्रपटांचे दिग्दर्शन करणार होते आणि त्याच्या अटकेपूर्वी आम्ही याच विषयावर चर्चा करत होतो, असे तिने स्पष्ट केले.

दरम्यान, पोलीस कारवाईच्या भीतीने राज कुंद्रा याने आधीच प्लॅन बी तयार केला होता. व्हॉट्सअप चॅटमधून याचा खुलासा झाला. 'हॉटशॉट्स' हे अ‍ॅप बंद केले तरी इतर माध्यमातून अश्लील चित्रफितींचा व्यवसाय सुरूच ठेवण्याचा प्रयत्न कुंद्रा याच्याकडून सुरू असल्याचे समोर आले. 'हॉटशॉट्स' हे अ‍ॅप 'प्ले स्टोअर'वरून काढून टाकण्यात आले होते. कुंद्रा सहभागी असलेल्या 'एच अकाऊंट्स' या व्हॉट्सअप ग्रुपमधील चॅटमधून हे समोर आले.