मी आता 'रिटायर्ड किसर' बनलोय - इमरान हाश्मी

आता आपल्याला 'सिरियल किसर' या इमेजचाही कंटाळा आल्याचं इमरान हाश्मी म्हणतोय 

Updated: Jan 11, 2019, 10:22 AM IST
मी आता 'रिटायर्ड किसर' बनलोय - इमरान हाश्मी title=

मुंबई : सिरियल किसर म्हणून ओळखला जाणारा अभिनेता इमरान हाश्मी 'व्हाय चीट इंडिया' या सिनेमातून आता प्रेक्षकांच्या समोर येतोय. नुकताच तो 'इमरान हाश्मी ऑन फर्स्ट किस' नावाच्या एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. ओडिशातल्या भुवनेश्वरमध्ये हा कार्यक्रम आयोजित  करण्यात आला होता. पण, या कार्यक्रमात इमराननं Kiss या शब्दाचा अक्षरश: किस पाडला. 'गेल्या १७ वर्षांपासून किस करून करून आता मी थकलोय... आता तर माझे ओठही सुजलेत' अशी प्रतिक्रिया इमराननं यावेळी दिलीय. मी आता 'रिटायर्ड किसर' बनलोय, असंही त्यानं यावेळी म्हटलं.

आता आपल्याला 'सिरियल किसर' या इमेजचाही कंटाळा आल्याचं त्यानं म्हटलंय. आपली ही ओळख का बनली आणि आता आपण ही ओळख पुसण्यासाठी किती प्रयत्न करत आहोत, हेदेखील इमराननं यावेळी सांगितलं. 

मर्डर सिनेमातील 'भीगे होठ तेरे' या गाण्यात मल्लिका शेरावतसोबत किस करताना इमरान पहिल्यांदा दिसला होता. हे गाणं भलतंच प्रसिद्ध झालं आणि इमरानही... पण, हा सिनेमा 'अडल्ट' सिनेमा होता, असंही इमराननं म्हटलंय. 

या सिनेमानंतर इमरानची ओळखही तशीच बनली. त्याच धाटणीचे सिनेमे त्याला ऑफर होऊ लागले. लग्नानतंर पत्नीला 'कॅमेऱ्यासमोर किसिंग सीन देणार नाही' असं वचन देणाऱ्या इमरानला त्यामुळे काही काळ सिनेमेही मिळणं बंद झालं होतं. हा अनुभव त्यानं याआधीही अनेकदा कथन केला होता. परंतु आता मात्र त्यानं या 'इमेज'मधून बाहेर पडायचंच असं ठरवलंय... त्यामुळेच आता तो स्वत:ला 'रिटायर्ड किसर' म्हणवून घेतोय.