'मेरा दिल ये पुकारे...' वर Madhuri Dixit कडून पाकिस्तानी मुलीचा डान्स कॉपी, लोकं संतापले, पाहा Video

'मेरा दिल ये पुकारे आजा...' गाण्यावर पाकिस्तानी मुलीचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल, माधुरी दीक्षितलाही मोह  आवरला नाही, चाहते करतायत ट्रोल

Updated: Dec 4, 2022, 03:15 PM IST
'मेरा दिल ये पुकारे...' वर  Madhuri Dixit कडून पाकिस्तानी मुलीचा डान्स कॉपी, लोकं संतापले, पाहा Video title=

Trending News : 'मेरा दिल ये पुकारे आजा...' या गाण्याचा सोशल मीडियावर (Social Media) सध्या फिव्हर आहे. या गाण्यावर पाकिस्तानी मुलगी आयशाने (Ayesha) केलेला डान्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. इन्स्टग्राम रिल्सवर (Instagram Reels) हे गाणं ट्रेंडींगला (Trending) आहे. अनेक जणांनी आयशासारख्या डान्स स्टेप करत या गाण्यावर रिल्स तयार केले आहेत. यात मुलीच नाही तर अनेक मुलांनीही व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे आता या यादीत डान्सिंग क्विन माधुरी दीक्षितचं (Madhuri Dixit) नावही जोडलं गेलं आहे.

माधुरीने केल्या आयशाच्या डान्स स्टेप्स कॉपी
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या  'मेरा दिल ये पुकारे आजा...' हा व्हायरल ट्रेंड फॉलो करण्यााच मोह बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितलाही आवरता आला नाही. या गाण्यावर माधुरी दीक्षितने आपल्या डान्सचं रिल्स बनवलं असून त्यात तीने आयशाच्या डान्स स्टेप्स कॉपी केल्या आहेत. माधुरी दीक्षितचा हा व्हिडिओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून  'मेरा दिल ये पुकारे आजा...' हे गाणं पुन्हा एकदा ट्रेंड होत आहे. 

माधुरीच्या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. माधुरीच्या चाहत्यांना हा व्हिडिओ प्रचंड आवडला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. पण काही युझर्सने माधुरीला ट्रोलही केलं आहे. एका युझरने म्हटलं मॅम तुम्ही आयशाचा डान्स कॉपी केला आहे, पण तिच्या इतका चांगला झाला नाही. एका युझरने म्हटलंय, तुमच्या सारख्या सेलिब्रेटिंनी डान्स कॉपी करणं आम्हाला आवडलं नाही. तर एका युझरसने थेट तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हीत असं म्हटलं आहे. 

माधुरीचा तूफान लूक
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवरुन माधुरीला ट्रोल केलं जात असलं तरी काही जणांना तिचा लूक खूपच आवडला आहे. साडीतला माधुरीचा लूक लोकांच्या पसंतीस पडतोय, इयररिंग्स, हातात बांगड्या, ग्लोइंग मेकअप आणि मोकळे सोडलेले केस या लूकमध्ये माधुरी खूपच सूंदर दिसत असल्याचं चाहत्यांनी म्हटलंय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by AYESHA (@oyee_ayesha)

कोण आहे व्हायरल गर्ल?
सोशल मीडियावर सध्या 'मेरा दिल ये पुकारे आजा...' या गाण्यााच प्रचंड ट्रेंड आहे. या गाण्यावर पाकिस्तानी मुलगी आयशाने केलेला डान्स व्हायरल होत आहे. आयशा ही एक टिकटॉकर आहे. आयशाने आपल्या डान्सचा व्हिडिओ 11 नोव्हेंबरला इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. एका लग्न समारंभात हे गाणं चित्रीत करण्यात आलं होतं. त्यानंतर हा डान्स व्हिडिओ बघता बघात इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला. सामान्य माणसापासून सेलिब्रेटिंपर्यंत अनेक जणांनी या गाण्यावर रिल्स बनवले आहेत.