रस्त्यावर भीक मागताना दिसला मराठी बिग बॉस विजेता! चेहऱ्याचीही वाईट अवस्था? Video व्हायरल

Entertainment : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस नेहमीच चर्चेत  असतो. हिंदीबरोबरच मराठी बिग बॉसही लोकांच्या पसंतीस उतरलाय. पण याच मराठी बिग बॉसचा एक विजेता रस्त्यावर चक्क भीक मागताना दिसला. सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून लोकांना धक्का बसलाय.

राजीव कासले | Updated: Feb 6, 2024, 05:26 PM IST
रस्त्यावर भीक मागताना दिसला मराठी बिग बॉस विजेता! चेहऱ्याचीही वाईट अवस्था? Video व्हायरल title=

Entertainment : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान सूत्रसंचलन करत असलेला छोट्या पडद्यावरील बिग बॉस (Big Boss) हा रिअॅलिटी शो चांगलाच लोकप्रिय झालाय. या कार्यक्रमातले वाद, भांडणं, प्रेमप्रकरण, वादग्रस्त वक्तव्य नेहमीच चर्चेत असतात. हिंदीबरोबर मराठी बिग बॉसलाही प्रेक्षकांची पसंत मिळते. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओत मराठी बिग बॉस विजेता कलाकार चक्क रस्त्यावर भीक मागताना दिसतोय. इतकंच नाही तर त्याच्या चेहऱ्याचीही वाईट अवस्था झाली असून त्याला पाहून लोकं दूर पळताना या व्हिडिओत दिसताय. हा व्हिडिओ पाहून चाहते हैराण झाले आहेत. 

कलाकारावर भीक मागण्याची वेळ?
मरठी बिग बॉस विजेता आणि हिंदी बिग बॉस 16 दिसलेला शिव ठाकरेचा (Shiv Thackeray) व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. शिव ठाकरे सध्या खतरो के खिलाडीमध्ये स्टंट करताना दिसला होता. त्यानंतर आता तो झलक दिखलाजामध्ये (Zalak Dikhalaja Ja) आपलं डान्सिंग टॅलेंट दाखवतोय. या कार्यक्रमात शिवाच्या डान्सिंग स्किल्सचं प्रेक्षकांकडून कौतुक होतंय. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ स्वत: शिव ठाकरे यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओत भीक मागताना दिसणारा तो व्यक्ती स्वत: शिव ठाकरे आहे. त्याचा मेकअपही भयानक करण्यात आला आहे. 

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत काय?
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत शिव ठाकरे फाटके कपडे घालून लोकांकडून भीक मागताना दिसत आहे. ऑटोमध्ये बसलेल्या एका महिलेकडे भीक मागण्यासाठी गेल्यावर ती महिला शिव ठाकरेचा अवतार बघून अक्षरश: घाबरुन किंचाळताना दिसतेय. एक ऑटो चालकाने अखेर शिवला पैसे दिले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका व्यक्तीनेही शिवला ओळखलं नाही. वास्तविक शिवने लोकांबरोबर प्रँक केला आहे. 

हा व्हिडिओ शिव ठाकरेने आपल्या टीमची मदत घेऊन बनवला आहे. मेकअप आर्टिस्टने शिवचा लूक इतका हुबेहुब भिकाऱ्यासारखा केला आहे की रस्त्यावरच्या एकानेही शिवला ओळखलेलं नही.  'आई' या चित्रपटातील अभिनेत्याचा लूक देण्यात आला आहे. या व्हिडिओला चाहत्यांनी भरपूर पसंती दिली आहे. शिवने लोकांसोबत केलेला प्रँक पाहून लोकांनी कौतुक केलं आहे. इतकंच नाही तर ज्या ऑटोचालकाने शिव ठाकरेला पैसे दिले त्याचंही युजर्सने कौतुक केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

शिव ठाकरेचे चाहते संतापले
दरम्यान शिव ठाकरे सध्या झलक दिखलाजामध्ये दिसतोय. पण शिव ठाकरेच्या चाहत्यांनी या कार्यक्रमावर टीका केली आहे. कार्यक्रमाचे आयोजक शिव ठाकरेचे प्रोमो जाणूनबुजून दाखवत नसल्याचा आरोप त्याच्या चाहत्यांनी केली आहे. कार्यक्रमातील दुसरा स्पर्धक शोएब इब्राहिम याचे प्रोमो जास्त दाखवले जातात असा आरोपही केला जात आहे. इतकंच नाही तर शिवच्या पाठिराख्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचंही आव्हान केलं आहे.