बघणार तेव्हा कळणार! 'जाऊ बाई गावात'च्या पहिल्या पर्वाच्या विजेता कोण असेल?

सध्या 'झी मराठी'वर सुरु असलेला हिट शो 'जाऊ बाई गावात' चांगलाच चर्चेत आहे. सध्या हा शो शेवटच्या टप्प्यात आहे. लवकरच याचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे.

Updated: Feb 6, 2024, 05:05 PM IST
बघणार तेव्हा कळणार! 'जाऊ बाई गावात'च्या पहिल्या पर्वाच्या विजेता कोण असेल?  title=

मुंबई : झी मराठी वाहिनी नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. झी मराठी वाहिनी अनेक नव-नवीन शो प्रेक्षकांच्या भेटीला येवून येत असते. काही दिवसांपुर्वी भेटीला आलेला 'जाऊ बाई गावात' हा शो फार कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करु लागला. आता हा शो शेवटच्या टप्प्यात. लवकरच जाऊ बाई गावात या शोचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन अभिनेता हार्दिक जोशीने केलं आहे. हा शो चांगलाच गाजला. आता प्रेक्षकांनाही या शोमध्ये कोण बाजी मारणार हे पाहायचं आहे. 

११ फेब्रुवारी रोजी 'जाऊ बाई गावात' ह्या बहुचर्चित शो च्या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. हे पर्व विशेष गाजलं ते म्हणजे स्पर्धक, त्यांना दिलेले टास्क, स्पर्धकांनी गावकऱ्यांची जिंकलेली मन ह्यामुळे. अस्सल मराठी मातीतला आणि गावाशी नाळ जोडलेला हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आहे.  ह्या फिनाले आठवड्यात स्थान मिळविणारे टॉप ५ स्पर्धक आहेत 'रमशा फारुकी', 'रसिक ढोबळे', 'संस्कृती साळुंके', 'स्नेहा भोसले' आणि 'श्रेजा म्हात्रे'. महाअंतिम सोहळ्याचा गावकऱ्यांसोबत संपूर्ण महाराष्ट्रात उत्साह निर्माण झाला आहे. 

मनोरंजन आणि तीव्र संघर्षांनी भरलेल्या 3 महिन्यांच्या रोलरकोस्टर राईडनंतर, 'जाऊ बाई गावातचे' हे स्पर्धक शोच्या ग्रँड फिनालेसाठी तयारी करत आहे. सीझनच्या विजेत्याचा मुकुट मिळवण्याचा अत्यंत अपेक्षित क्षण आठवड्याच्या शेवटी होणार आहे. ह्या अंतिम भागात स्पर्धकांच्या आता पर्यंतच्या प्रवासाची झलक पाहायला मिळेल. त्यासोबत हे फायनॅलिस्ट स्पर्धक दमदार परफॉर्मेंस सादर करणार आहे. तर खास पाहुणे बनून येणार आहेत सर्वांचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर, त्यांचा सोबत असणार आहेत सोनाली कुलकर्णी आणि महेश मांजरेकर. सोनालीचा दिलेला मजेशीर टास्क स्पर्धक आणि प्रेक्षकांची उत्कंठा वाढविणार असणार आहे. आणि महेश मांजरेकर सर आले म्हणजे स्पर्धकांची शाळा भरणार हे नक्की.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आता फक्त प्रतीक्षा आहे महाअंतिम सोहळ्याची. तुम्हाला पण उत्सुकता असेल ना 'जाऊ बाई गावात'च्या ह्या पहिल्या पर्वाच्या विजेता कोण असेल ह्याची. तर मनोरंजनानी भरलेली ही संध्याकाळ मिस करून नका. आपल्या कॅलेंडरवर ११ फेब्रुवरीची नोंद करून ठेवा. आणि पाहायला विसरू नका 'जाऊ बाई गावात' महाअंतिम सोहळा ११ फेब्रुवारी संध्या ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.