Tiger 3 Box Office Collection Day 4: बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफचा (Katrina Kaif) अॅक्शन थ्रिलर चित्रपट टायगर-3 (Tiger 3) देशभरात प्रदर्शित झाला. पहिल्या तीन दिवसात सलमानच्या चाहत्यांचा चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पहिल्या दोन दिवसातच टायगर-3 ने कमाईच्याबाबतीत शंभर कोटीचा टप्पा पार केला. पण चौथ्या दिवशी बॉक्सऑफिसवर टायगरची मांजर झाली. चाहत्यांनी चित्रपटगृहाकडे अक्षरश: पाठ फिरवली. याला कारण ठरलं ते भारत-न्यूझीलंड सेमीफायनल. आयसीसी विश्वचषकात बुधवारी भारत आणि न्यूझीलंडदरम्यान पहिली सेमीफायनल (India vs New Zealand Semifianal) खेळवण्यात आली. याचा फटका सलमानच्या टायगर-3 ला बसला.
'टाइगर 3' चं चौथ्या दिवसाचं कलेक्शन
सलमान खानच्या टायगर-3 चित्रपटाने पहिल्या दिवशी 44.5 कोटी रुपयांचं कलेक्शन करत शानदार ओपनिंग केली. पण चौथ्या दिवशी यात दुपटीहून अधिक घसरण झाली. Sacnilk च्या रिपोर्टनुसार प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी म्हणजे बुधवारी टायगर-3 चित्रपटाने केवळ 14.88 कोटी रुपयांची कमाई केली. चार दिवसात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकूण 162.38 रुपयांचं कलेक्शन केलं आहे.
चित्रपटाचं दिवसानुसार कलेक्शन
टायगर-3 हा चित्रपट सलमानाचा बिग बजेट चित्रपट आहे. दिवसानुसार कमाई पाहिली तर पहिल्या दिवशी या चित्रपटाने 44.5 करोड रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आणि 59 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं. तिसऱ्या दिवशीही चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आणि चित्रपटाने 44 कोटींची कमाई केली. पण चौथ्या दिवशी यात निम्म्याहून अधिक घट झाली. भारत-न्यूझीलंड सेमीफायनलमुळे प्रेक्षकांनी चित्रपटागृहाकडे पाठ फिरवली. त्यामुळे चौथ्या दिवशी गल्ल्यात केवळ 14.88 लाख रुपये गोळा झाले.
इमरान हाश्मी व्हिलेनच्या भूमिकेत
सलमान खान आणि कतरीना कैफचा टायगर-3 हा चित्रपट स्टार्सने भरलेला आहे. वायआरएप स्पाय युनिव्हर्सचा हा पाचवा चित्रपट आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ व्यतिरिक्त इमरान हाश्मी या चित्रपटात मुख्य व्हिलनची भूमिका साकारतोय. हॉलिवूड अभिनेत्री मिशेल ली हिनेदेखील भूमिका साकारली आहे. आदित्य चोप्राने या चित्रपटाची निर्मिती केली असून, मनिष शर्माने दिग्दर्शन केलं आहे.
या चित्रपटात किंग खान शाहरुखने कॅमिओ आणि ऋतिक रोशनने एक पोस्ट क्रेडिट दृश्य साकारलं आहे. एक था टायगर आणि टायगर जिंदा है प्रमाणेच टायगर-3 हा चित्रपटही रॉ एजंय टायगर (सलमान खान) आणि आयएसआय एजंट झोया (कतरीना कैफ) च्या एक सिक्रेट मिशवर आधारीत आहे.