TMKOC : तारक मेहतामध्ये टप्पूच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री, पोपटलालच्या आधी होणार जेठालालच्या मुलाचं लग्न?

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Episode: गोकूळधाममध्ये आली टप्पूची गर्लफ्रेंड, होणाऱ्या सुनेला पाहून जेठालाल आणि चंपकचाचा झाले खूश

Updated: Feb 20, 2023, 05:30 PM IST
TMKOC : तारक मेहतामध्ये टप्पूच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री, पोपटलालच्या आधी होणार जेठालालच्या मुलाचं लग्न? title=

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : छोट्या पडद्यावरची सर्वात यशस्वी मालिक म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा (TMKOC). गेली चौदा वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आता या मालिकेत एक नवा ट्विस्ट आला आहे.  लवकरच तारक मेहता मालिकेतील गोकुळधाम सोसायटीत (Gokuldham Society) प्रेक्षकांना हंगामा पाहिला मिळणार आहे. मालिकेत नव्या टप्पूचीही (Tappu) एन्ट्री झाली आहे. त्यामुळे साहजिकच सोसायटीत पुन्हा एकदा खोड्या पाहिला मिळणार आहेत. मालिकेत नव्या टप्पूची एन्ट्रीही अगदी शानदार करण्यात आली होती. 

टप्पूच्या एन्ट्रीनंतर आता गोकुळधाम सोसायटीत आणखी एका कलाकाराची एन्ट्री होणार आहे. या व्यक्तीला पाहून जेठालाल, चंपकचाचा (Champak Chacha) आणि आत्माराम भिडेंचे (Atmaram Bhide) चेहरे आनंदने उजळून निघालेत. 

टप्पूच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री
वास्तविक या मालिकेचा एक प्रोमो (TMKOC New Episod) समोर आला असून टप्पूला भेटायला त्याची एक खास मैत्रिण (Tappu GirlFriend) सोसायटीत येते. कारमधून तिची सोसायटीत एन्टी होताना दाखवण्यात आलंय. ती कारमधून उतरताच टप्पू धावत येतो आणि तिला मिठी मारतो. हे दृश्य पाहून बालकनीत उभे असलेले चंपक चाचा आणि जेठालाल थक्क होतात. तर सोनू आणि भिडेंना शॉक बसतो. टप्पू त्या मुलीशी लग्न करून आपल्यासाठी सून घेऊन येणार असल्याचं चंपक चाचांना वाटतं. त्यामुळे ते खूश होतात. तर आत्माराम भिडेही चंपक चाचांना लग्नाची तारीख विचारताना या प्रोमोत दाखवण्यात आलं आहे. 

पोपटलालआधी टप्पूचं लग्न
या प्रोमोमुळे आता चाहत्यांना प्रश्न पडलाय, तो म्हणजे पोपटलाल आधी टप्पूचं लग्न होणार का याचा. मालिक सुरु झाल्यापासून म्हणजे गेली पंधरा वर्ष मालिकेत्र पत्रकार पोपटलाल अविवाहीत दाखवण्यात आलं आहे. पण आता पोपटलाल आधी टप्पू मुंडावळ्या बांधणार असल्याने पोपटलाची प्रतिक्रिया काय असणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 

हे ही वाचा : 3 वर्षांची असताना वडिल गेले, आईने मजूरी केली... आता ओळखली जाते टीम इंडिया प्रती झुलन गोस्वामी

टप्पूच्या लग्नाच्या चर्चेमुळे आत्माराम भिडे म्हणजे भिडे मास्तर चांगलेच खुश झाले आहेत. भिडे मास्तरांची मुलगी सोनू भिडे आणि टप्पू लहानपणापासूनचे मित्र आहेत. आता ते वयात आलेत, पण यामुळे आत्माराम भिडेंचं टेन्शन मात्र वाढलं आहे. आता टप्पूच्या गर्लफ्रेंडची चर्चा ऐकून ते चांगलेच खूश झाले आहेत.