मुंबई : तेलगू अभिनेता महेश बाबू या दिवसात आपल्या एका फिल्मच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात महेशबाबूसोबत किर्ती सुरेश मुख्य भूमिकेत काम करणार आहे. त्यानंतर महेश बाबू एसएस राजामौली यांच्या सिनेमातही दिसणार आहे. परंतु त्या आधी तो पॅन इंडिया सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त असणार आहे. या सिनेमात तो श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सोबत रोमान्स करताना दिसणार आहे. महेश बाबू आणि जान्हवी कपूरला टॅालीवूडमध्ये एकत्र आणणारा फिल्म मेकर दुसरा, तिसरा कोणी नसून, तो करण जोहर (Karan Johar) आहे.
जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही टॅालीवूडमध्ये Entry करणार, अशी खबर खूप दिवसांपासून ऎकायला येत होती. टॅालीवूडमधील दिगदर्शक जान्हवी कपूरला आपल्या सिनेमात घेण्याचे खूप प्रयत्न करत होते, परंतु आता करण जोहर सोबत काम करण्याचा निर्णय घेऊन जान्हवी टॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
याआगोदर महेश बाबूचे वडील कृष्णा आणि जान्हवी कपूरची आई श्रीदेवीची या दोघांनी अनेक हिट सिनेमे एकत्र केले होते आणि या जोडीला प्रेक्षकांनीही खूप पसंत केले. आता हीच अपेक्षा महेश बाबू आणि जान्हवीकडूनही केली जात आहे.
हिंदी प्रेक्षकांनी दाक्षिणात्य स्टार्सना खूप पसंती दिली आहे. ज्यामुळे एकामागून एक अभिनेते बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. प्रभास आणि यश नंतर आता, विजय देवरकोंडाने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आहे. अनन्या पांडेसोबत तो करण जोहरच्या 'लाइगर' या चित्रपटात दिसणार आहे. 'लाइगर' हा पॅन इंडिया चित्रपट आहे. प्रेक्षकांना आशा आहे की, हा चित्रपट अनेक रेकॉर्ड मोडेल.
महेश बाबूबद्दल बोलायचं झालं तर बॉलिवूड चित्रपटांसाठी बर्याच वेळा दिगदर्शकांनी त्याला संपर्क केला, पण त्याचे म्हणने होते की तेलगू चित्रपटांमध्येच त्याला काम करायचे आहे, यामुळे त्याने बॉलिवूड चित्रपटांना होकार दिला नाही. त्याचे असे बरेचं चाहते आहेत, ज्यांना त्याला बॉलिवूडमध्ये काम करताना पाहायचे आहे. आता महेश बाबू आपल्या चाहत्यांची ही इच्छा कधी पूर्ण करेल हे तर, फक्त तोच सांगू शकतो.