Exclusive : चला, यांचंही ठरलं.... रणबीर- आलियाच्या लग्नाची वेळ, ठिकाण निश्चित

अखेर आली समीप घटिका

Updated: Dec 14, 2021, 02:36 PM IST
Exclusive : चला, यांचंही ठरलं.... रणबीर- आलियाच्या लग्नाची वेळ, ठिकाण निश्चित title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : कोरोनाचं संकट आलं नसतं तर, केव्हाच लग्न उरकलं असतं असं वक्तव्य अभिनेता रणबीर कपूर यानं केलं. दरम्यानच्या काळात खूप काही होऊन गेलं. आता म्हणे ही जोडी अखेर पुढच्या टप्प्यावर पोहोचली आहे. अधिकृतपणे आता कपूर आणि भट्ट कुटुंब आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या तयारीला लागले असल्याचं कळत आहे.

रणबीर आणि आलियानं लग्नाचा मुहूर्त बऱ्यापैकी पुढे ढकलला आहे. पुढच्या वर्षी डिसेंबर किंवा 2023 च्या जानेवारी महिन्यात त्यांची लग्नगाठ बांधली जाणार आहे. हो, आणि ते डेस्टिनेशन वेडिंग करणार नाहीत हेसुद्धा आता स्पष्ट झालं आहे.

आलियाशी संलग्न सूत्रांच्या माहितीनुसार ही जोडी मुंबईतच लग्नबंधनात अडकणार आहे. या सोहळ्याला अगदी कमी पाहुण्यांची उपस्थिती असणार आहे.

रणबीरच्या कुटुंबातील वरिष्ठ मंडळी आणि आलियाचे वडिल महेश भट्ट हे सर्वजण दूरचा प्रवास करु शकणार नाहीत. ज्यमुळं त्यांनी या मुलांना लग्न मुंबईत करण्यासाठी तयार केलं आणि आलिया-रणबीरलाही ही बाब पटली.

ताज लँड्स एंड इथं हा विवाहसोहळा पास पडणं आता जवळपास निश्चितच झालं आहे. आलियाकडून या विवाहसोहळ्यासाठी तिच्या काही मैत्रीणीही हजर असतील.

मागील काही काळापासून सेलिब्रिटी जोड्यांमध्ये आलियाचं नावही घेतलं गेलं. रणबीरशी ती केव्हा लग्न करणार हाच प्रश्न तिला अनेक ठिकाणी विचारला गेला. पण, आता मात्र हे चित्र स्पष्ट झालं असून, आतापासून शक्य तशी तयारी करण्यात खुद्द आलिया आणि रणबीर व्यग्र होत असल्याचं पाहायला मिळत आहे.  

सध्या बी- टाऊनमध्ये विकी आणि कतरिनाच्या लग्नाची, त्यांच्या वेडिंग लूकचीच चर्चा सुरु आहे. तेव्हा आता आलिया आणि रणबीर त्यांच्या लग्नासाठी नेमका कोणता लूक ठरवतात याकडेच चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.