मुंबई : अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मोठा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) मागील काहीर दिवसांपासून एनसीबीच्या ताब्यात आहे. अशाच वेळी त्याच्याशी संबंधीत एक मोठी माहिती समोर आली आहे. आर्यनबाबतची सर्व माहिती, त्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर गाजत असतानाच आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.
व्हिडीओमध्ये केस बांधलेला एक व्यक्ती तरुण मुलाला मिठी मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ शाहरुख आणि आर्यनचा असून, बी टाऊनच्या या किंग खानने न्यायालयाबाहेर जाऊन मुलाला मिठी मारली अशा चर्चांनी जोर धरला. व्हिडीमध्ये दुरून दिसणारी ती व्यक्ती म्हणजे शाहरुखच आहे असा दावा करण्यात येत होता. पण, व्हिडीओमध्ये दिसणआरा केस बांधलेला तो व्यक्ती शाहरुख नाही आणि तो ज्याला मिठी मारत आहे तो आर्यन नाही.
हा व्हिडीओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा तो मोठ्या प्रमाणात पाहिला आणि शेअरही केला गेला. पण, मुळात हा व्हिडीओ फेक आहे. कारण न्यायालयाच्या परवानगीशिवाय कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला कोठडीत असणाऱ्या व्यक्तीची भेट घेता येत नाही. अशी उघड गळाभेट तर निव्वळ अशक्य.
SRK met with Aryan Khan . #SRK #AryanKhan #ReleaseAryanKhan pic.twitter.com/A6yv0EnsDG
— Movie Critic (@Strawberrry927) October 7, 2021
कोणाला भेटण्याची परवानगी?
न्यायालयानं ज्यावेळी आर्यनला भेटण्यासाठी कुटाबातील व्यक्तींची नावं मागितली होती, त्यावेळी त्याचे वकील सचिन मानेशिंदे यांनी शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिचं नाव पुढे केलं होतं. गुरुवारी शाहरुख त्याच्या घराबाहेरच आला नाही. मन्नतबाहेर असणाऱ्या गर्दीला टाळून निसटणं निव्वळ अशक्य. त्यामुळे हा व्हिडीओ फेक असल्याचंच स्पष्ट होत आहे.