Fact Check : अभिनेता सलमान खानचा 'या' अभिनेत्रीसोबत थाटामाटात पार पडला साखरपुडा?

सलमानच्या साखरपुड्याचा एक फोटो व्हायरल होत आहे. जो पाहून चाहते हैराण झाले आहेत पण....

Updated: Dec 4, 2022, 06:09 PM IST
 Fact Check : अभिनेता सलमान खानचा 'या' अभिनेत्रीसोबत थाटामाटात पार पडला साखरपुडा? title=

मुंबई : 'सलमान खान कधी लग्न करणार?' हा सलमान खानच्या चाहत्यांना पडलेला सर्वात मोठा पडलेला प्रश्न आहे. याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॉलिवूडमध्ये कोणाच्या लग्नाची सर्वात जास्त चाहत्यांना आतुरता असेल तर ती म्हणजे सलमान खानच्या लग्नाची. सलमान खानच्या लग्नाची बातमी बर्‍याचदा समोर आली आहे. मात्र आजपर्यंत त्याने लग्न केलं नाही. खरंतर आज सलमानच्या साखरपुड्याची बातमी समोर आली आहे. खरतंर ही बातमी जरी जुनी असली तरी सोशल मीडियावर पुन्हा एकदा या बातमीने जोर धरला आहे.

सलमानच्या साखरपुड्याचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सलमानने सोनाक्षी सिन्हासोबत साखरपुडा केल्याचं बोललं जात आहे. फोटोमध्ये सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा दिसत आहेत. त्याचबरोबर या फोटोत सोनाक्षीच्या भांगेत सिंदूर भरलेलं दिसत आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला या व्हायरल फोटोमागचं सत्य सांगणार आहोत.  

सलमान आणि सोनाक्षीचा हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. असंही म्हटलं जातं की, या दोघांनी गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. मात्र या व्हायरल फोटोमागचं सत्य ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. हा फोटो खरा नसून हा फोटो पुर्णपणे एडिट करण्यात आला आहे. यावर फोटोशॉप करण्यात आलं आहे. खरंतर सलमान आणि सोनाक्षीचं लग्न झाल्याची ही बातमी पुर्णपणे खोटी आहे.  

एकीकडे सलमानचं नाव लुलीया वंतूरसोबत जोडलं जातंय तर दुसरीकडे सोनाक्षी सिन्हाचं झहीर इक्बालसोबत जोडलं गेलं आहे. मात्र, सोनाक्षीने झहीरसोबत अफेअर असल्याचं कधीच तिने कबूल केलं नाही. दबंग गर्लने तिच्या एका मुलाखतीत सांगितलं की, ती झहीरसोबत रिलेशनशिपमध्ये नाहीये. झहीर हा तिचा फक्त चांगला मित्र आहे. 

सलमानसोबत जोडलं गेली आहेत या अभिनेत्रींची नावं
सलमान खानने बिग बॉस 15 मध्ये रिलेशनशिपमध्ये असल्याचे संकेत दिले होते. तेव्हापासून त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. लूलियाआधी सलमान खान अनेक अभिनेत्रींसोबत रिलेशनशिपमध्ये होता. ज्यामध्ये ऐश्वर्या रायचे नाव आघाडीवर आहे. त्यानंतर सलमान खान कतरिना कैफ, जरीन खान, जॅकलिन फर्नांडिस यांच्याशी जोडला गेला.