मुंबई : सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आणि श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी गेल्या आठवड्यात एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या बातम्यांना उधाण आलं होतं. इब्राहिम आणि पलक यांच्याबाबत असं म्हटलं जात होतं की, दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, अद्याप या दोघांनीही याबाबत काहीही सांगितलेले नाही. त्याचबरोबर, आता या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे.
रेस्टॉरंटमध्ये गेले होते पलक आणि इब्राहिम
रिपोर्टनुसार, इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी एकमेकांना डेट करत नाहीत. दोघं फक्त चांगले मित्र आहेत आणि एकत्र पार्टीसाठी गेले होते. एका सूत्रानुसार, इब्राहिम आणि पलक एकत्र रेस्टॉरंटमध्ये गेले होते. दोघांनी तिथे जेवण केलं आणि काही वेळ एकत्र घालवला. यानंतर दोघंही दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये गेले, जिथे मीडियाने त्यांना एकत्र पाहिलं.
डिनर करण्यासाठी अनेकदा जातात एकत्र
सूत्राने पुढे सांगितलं की, पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान हे खूप चांगले मित्र आहेत आणि दोघं अनेकदा एकत्र डिनरसाठी बाहेर जातात. पलकने तिचा चेहरा लपवायला सुरुवात केली कारण तिने तिचं आयुष्य खाजगी ठेवणे पसंत केलयं. या दोघांबाबतच्या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नाही.
व्हायरल झाला होता व्हिडिओ
सूत्रांनी सांगितलं की, सेलिब्रिटींची मुलं अनेकदा एकमेकांसोबत वेळ घालवताना आणि पार्टी करताना दिसतात. पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान एकत्र जेवायला गेले तर याचा अर्थ असा नाही की, दोघांमध्ये काही चाललं आहे. इब्राहिम आणि पलक बांद्रा ईथे स्पॉट झाल्याची माहिती आहे. दोघंही गाडीत बसलेले दिसले. जेव्हा पापाराझींनी फोटो काढायला सुरुवात केली तेव्हा इब्राहिम खूपच आरामदायक दिसत होता पण पलकने तिचा चेहरा लपवायला सुरुवात केली. यादरम्यानचा एक व्हिडिओही प्रचंड व्हायरल झाला.