मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा दोन अभिनेत्री होवून गेल्या, ज्यांची कायम एकमेकींसोबत तुलना झाली.. त्या दोन अभिनेत्री म्हणजे दिव्या भारती आणि श्रीदेवी. दिव्या भारतीने हिंदी सिनेमात 'विश्वात्मा' मधून डेब्यू केलं आहे. बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतर दिव्या भारती श्रीदेवीची जागा घेणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र 19 वर्षाच्या दिव्या भारतीचा आकस्मित मृत्यू झाला. तिच्या अशा जाण्याने प्रत्येकालाच धक्का बसला.
दिव्या भारती आणि श्रीदेवीचा चेहरा इतका मिळता जुळता होता की, दिव्या भारतीच्या मृत्यूनंतर एका सिनेमात तिच्या जागी श्रीदेवीला घेण्यात आलं. 1994 मध्ये 'लाडला' या सिनेमात दिव्या भारतीला घेण्यात आलं त्यानंतर सिनेमाचा काही भाग शूट झाल्यानंतर दिव्या भारतीच अचानक निधन झालं.
'लाडला' सिनेमा दरम्यानचा एक किस्सा अभिनेत्री रवीना टंडनने सांगितला. 'मी, दिव्या आणि शक्ती कपूर औरंगाबादमध्ये 'लाडला' सिनेमाची शुटिंग करत होतो. तेव्हा ऑफिसमधील एक सीन करताना दिव्या सतत अडखळत होती... त्यामुळे त्या सीनसाठी अनेक रीटेक घ्यावे लागले...'
रवीना पुढे म्हणाली, 'दिव्याच्या मृत्यूनंतर श्रीदेवीसोबत शुटिंगची सुरुवात झाली. तेव्हा श्रीदेवी देखील तो सीन करताना सतत अडखळत होती. त्यामुळे आम्ही सगळे घाबरलो. त्यावेळी शक्तीने 'गायत्री मंत्र... ' बोलण्याचा सल्ला दिला.. '
'शक्तीच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही सगळे गोल उभे राहिलो, मी श्रीदेवीचा हात धरला आणि गायत्री मंत्र बोलण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्या जागी नारळ फोडून पुन्हा शुटींगला सुरूवात केल्याची माहिती रवीनाने एका मुलाखती दरम्यान दिली.