रणवीर सिंगवर मोठं कर्ज, म्हणाला त्यांनी माझी राख....

आघाडीच्या अभिनेत्यांसोबतच तो सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीतही जाऊन बसला. 

Updated: Feb 26, 2022, 03:01 PM IST
रणवीर सिंगवर मोठं कर्ज, म्हणाला त्यांनी माझी राख....
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई :  अभिनेता रणवीर सिंग यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि पाहता पाहता त्यानं यशाचं शिखर गाठलं. पहिल्या चित्रपटापासून ते अगदी आतापर्यंत वेळोवेळी त्यानं बहुविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. (Ranveer Singh)

आघाडीच्या अभिनेत्यांसोबतच तो सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीतही जाऊन बसला. 

रणवीरचं करिअर घडवणाऱ्यांमध्ये काही खास व्यक्तींचा समावेश आहे, मुळात रणवीरही त्यांच्या योगदानाला आणि मदतीला विसरलेला नाही. 

पण, हाच रणवीर आता आपण कर्जबाजारी असल्याचं का बरं म्हणत आहे? तुम्हीही पेचात पडलात ना? रणवीरचं सर्वकाही ठिक आहे ना, तुम्हालाही हाच प्रश्न पडतोय ना? 

नका फार काळजी करु. कारण तो कर्जबाजारी असल्याचं म्हणतोय खरा, पण त्यामागचं कारण वेगळं आहे. 

काय म्हणाला रणवीर ? 
'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाच्या प्रिमियरच्या वेळी, माध्यमांशी संवाद साधताना रणवीरनं संजय लीला भन्साळी यांच्यासोबतचं आपलं नातं सर्वांसमोर आणलं. 

यावेळी रणवीरच्या मनात निव्वळ कृततेची भावना होती. आपल्या कारकिर्दीमध्ये भन्साळींचं मोठं योगदान असल्याचं तो म्हणाला. 

मी अभिनय करायचो आणि मला सर्व ठाऊक आहे, असाच अविर्भाव होता. पण, भन्साळींनी मला पुन्हा घडवलं. त्यांनी मला तोडलं, माझी राख केली आणि एक कलाकार म्हणून मला पुन्हा घडवलं. आयुष्यभरासाठी मी त्यांच्या कर्जबाजारी असेन... असं तो म्हणाला होता. 

रणवीर शक्य त्या प्रत्येक वेळी भन्साळींचे आभार मानताना दिसतो. हासुद्धा त्यातलाच एक भावनिक प्रसंग.