'या' प्रसिद्ध अभिनेत्रींने एका महिलेलाल खुल्लम-खुल्ला केल KISS!

महिला स्पर्धकांनी सर्वांसमोर  KISS करुन गोंधळ घातला आहे.

Updated: Aug 13, 2021, 10:30 PM IST
'या' प्रसिद्ध अभिनेत्रींने एका महिलेलाल खुल्लम-खुल्ला केल KISS! title=

मुंबई : सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस' यावेळी नव्या रंगात प्रेक्षकांसमोर आला आहे. शोचा होस्ट आणि फिल्ममेकर करण जोहरने शो ऑन होण्यापूर्वी दावा केला होता की, त्याचा शो 'बिग बॉस ओटीटी' ओवर द टॉप असेल. पहिला आठवडा अजून संपलेला नाही आणि करणचा दावा पूर्ण होऊ लागला आहे. आतापर्यंत, जिथे अनेक सेलेब्स शोमध्ये जोडले गेले आहेत, आता या नवीन सीझनमध्ये, नेहा भसीन आणि रिद्धिमा पंडित या दोन महिला स्पर्धकांनी सर्वांसमोर  KISS करुन गोंधळ घातला आहे.

काय आहे प्रकरण
'बिग बॉस'च्या घराची जोरदार चर्चा सुरु आहे. जिथे शमिता शेट्टी आणि राकेश बापट, निशांत आणि मूस जताना आणि उर्फी जावेद सारख्या लोकांना पहिल्या आठवड्यातच नॉमिनेट करण्यात आलं आहे. त्याचवेळी, प्रतीक सहजपाल आणि अक्षरा सिंह यांनी बॉस मॅन आणि बॉस लेडी बनून घरावर राज्य केलं आहे. बीबी हाऊसमध्ये नेहमी मुला -मुलींच्या जोड्या असतात. पण यावेळी एक वेगळी जोडी दिसणार आहे. कारण गायिका नेहा भसीन भावूक झाली आणि इतर महिला स्पर्धक रिद्धिमा पंडितला खुलेपणाने KISS केली.

कशी आली इतक्या जवळ?
KISS पर्यंत पोहोचण्याची कथा खूपच रोचक आहे. घरामध्ये सध्या पुढील बॉस लेडी आणि बॉस मॅन शोधण्याचं काम सुरू आहे. या टास्कमध्ये स्‍टॅचू बनण्याचं आवाहन देण्यात आलं होतं. ज्यामध्ये समोरच्या टीमला स्‍टॅचू अवस्थेतून हलण्यासाठी सक्ती करावी लागेल. यासाठी नेहाने एक अतिशय विचित्र पद्धत वापरली आणि रिद्धिमाला हलवण्यासाठी प्रेमाची युक्ती वापरली. यासाठी तिने तिच्या अगदी जवळ जाऊन सगळ्यांसमोर किस केलं.