किती गोड! दिया मिर्झाच्या मुलाची पहिली झलक; त्याला नाव दिलं...

चाहत्यांना तिच्या या पोस्टनं थक्कच केलं. 

Updated: Aug 13, 2021, 10:15 PM IST
किती गोड! दिया मिर्झाच्या मुलाची पहिली झलक; त्याला नाव दिलं...
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेऊन तशी कृती करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत दिया मिर्झा हिचं (Dia Mirza) नाव अग्रस्थानी येतं. दियानं आजवर कायमच तिच्या प्रत्येक निर्णयानं चाहत्यांचं मन जिंकलं आहे. अगदी खासगी जीवनातही ही बॉलिवूड अभिनेत्री सुपरहिट ठरत आहे. 

अशा या अभिनेत्रीनं आता थेट मुलगा ( Son) अव्यान याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चाहत्यांना तिच्या या पोस्टनं थक्कच केलं. जिथं तिनं थेट बाळाची पहिली झलकच सर्वांच्या भेटीला आणली. 

वर्ल्ड एलिफंट डे, म्हणजेत जागतिक हत्ती दिवसाच्या निमित्तानं दियानं ही खास पोस्ट केली. दियाची ही पोस्ट अनेकांच्याच चेहऱ्यावर आनंद आणणारी ठरली, पण काहींनी मात्र यावरही नाराजी व्यक्त केली. कारण, त्यांना तिच्या मुलाचा संपूर्ण चेहरा पाहण्याबाबत कुतूहल होतं. 

गरोदरपणात मलायकाची विशेष काळजी; 'या' खास व्यक्तीला दिला सल्ला 

 

14 मे रोजी दियानं एका मुलाला जन्म दिला होता. जवळपास 2 महिने दियानं त्याच्या जन्माचं वृत्त कोणासमोरही येऊ दिलं नाही. अव्यान हा प्रीटर्म बेबी असल्यामुळंच ही काळजी दियानं घेतली आणि योग्य वेळ येताच तिनं त्याच्या जन्माची बातमी सर्वांना दिली. 

दियानं यंदाच्याच वर्षी व्यावसायिक वैभव रेखी याच्याशी लग्नगाठ बांधली होती. दिया आणि तिचा पती, या दोघांचंही हे दुसरं लग्न. अव्यानच्या रुपानं दियानं पहिल्यांदाच मातृत्त्वाचा अनुभव घेतला आहे,त तर वैभवला समायरा ही मुलगी आहे. अव्यानच्या येण्यानं दिया, तिचा पती आणि मुलगा- मुलगी यांच्या कुटुंबाता जणू एक चौकोनच तयार झाला आहे.