'मी रॅपिंग सोडणार आहे,' बिग बॉस 16'चा विजेता एमसी स्टॅनची सोशलमिडीयावर पोस्ट

Bigg Boss fame MC Sten : बिग बॉस फेम आणि रॅपर म्हणून ओळखला जाणारा एमसी स्टेन मागील काही दिवसांपासून सतत चर्चेचा विषय ठरत आहे. स्टेन इंस्टाग्रामवर पोस्ट स्टोरीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.   

Updated: Apr 9, 2024, 03:13 PM IST
'मी रॅपिंग सोडणार आहे,' बिग बॉस 16'चा विजेता एमसी स्टॅनची सोशलमिडीयावर पोस्ट title=

Bigg Boss fame MC Sten News in Martahi :   बिग बॉस 16 व्या पर्वाचा विजेता एमसी स्टेन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एमसी स्टेन हा प्रसिद्ध रॅपर असून सोशलमीडियावर त्याचे फॉलोवर्स मोठ्या प्रमाणात आहेत.  एमसी स्टेनने इंस्टाग्राम केलेल्या पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पुढे कधीही रॅप करणार नसल्याची माहिती त्याने त्याच्या सोशलमीडियावरून दिली होती. ही पोस्ट त्याने काही वेळाने डीलीट केली. या पोस्टमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये गोंधळ  निर्माण झाला आहे. एमसी स्टेन असा निर्णय का घेतला ? सोशलमीडियावर पोस्ट ती काही वेळाने डीलीट का केली ? या बाबत त्याने अजूनही कोणत्याही प्रकारचा खुलासा केला नाही. 

एमसी स्टेन हा प्रसिद्ध रॅपर आहे. त्याच्या रॅपमधील शब्दांनी त्याने अनेकांची मनं जिंकली.  सोशलमीडियावर एमसी स्टेनचा फॅन फॉलॉविंग मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्या रॅपमुळे त्याला लोकांची पसंती मिळाली. एमसी स्टेनच्या लाईव्ह कॉन्सर्टला कानाकोपऱ्यातून त्याचे चाहते खास त्याचं गाणं आणि रॅप ऐकण्यासाठी येत असातात. अश्यातच त्याने रॅप सोडणार असल्याच्या केलेल्या पोस्टने साऱ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.

 

 इंस्टाग्राम स्टोरीमध्ये कॅप्शन लिहित एमसी स्टेन म्हणतो की, मी रॅप सोडणार आहे. काही वेळातच त्याची ही स्टोरी डिलीट करण्यात आली.  मात्र त्याने ही स्टोरी डिलीट करण्याआधीच त्याचे स्क्रीनशॉट सोशलमीडियावर व्हायरल झाले.या सगळ्यावर अजूनही स्टेनने कोणत्याही प्रकारे खुलासा केला नसून नक्की हे प्रकरण आहे तरी काय याबाबत स्टेनच्या चाहत्यांमध्ये संभ्रम सुरु आहे. एमसी स्टेन हा मागील काही दिवसांपासून दुसऱ्यांदा चर्चेत आला आहे. 

गेल्या महिन्यात त्याचं युट्युब चॅनेल हॅक झाल्याची माहिती मिळाली होती. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत,स्टेन म्हणाला की, मी झोपेत असतानारा त्री तीन वाजता मला मोबाईल नोटीफिकेशन आलं होतं. कोणीतरी माझ्या युट्युब चॅनेलवरुन लाईव्ह सेशन घेत. पहाटे तीन ते चार दरम्यान 25 हजार लोक लाईव्ह सेशन अटेंड करत होते. ते 12 तास मला आणि माझ्या मॅनेजरसाठी तणावाचे होते. त्यावेळी माझ्या  युट्युब चॅनेलवरुन माझं ऑफिशियल प्रोफाईल सगळं लॉगआउट केलं होतं. हे सगळं याआधी अनेकांसोबत झालं असलं तरी या सगळ्याचा मला खूप त्रास झाला. असं त्याने मुलाखतीत सांगितलं होतं.