Pune Crime News : पुण्याच्या PMPL बसमधील मारहाणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला आहे. एका महिलेने छेड काढणाऱ्या चांगलाच चोप दिल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. या महिलेने छेड काढणाऱ्याची कॉलर पकडून त्याला 26 थप्पड लगावल्या. याबाबत तिने कंडक्टरला जाब विचारला. मात्र, कंडक्टरचे उत्तर ऐकून या महिलेचा संताप झाला आणि तिने थेट बस पोलिस स्टेशनला घ्यायला सांगितली.
पुणे येथे सिटी बसमध्ये एका महिलेची छेडछाड करणा-या व्यक्तीला महिलेने चांगलाच धडा शिकवला. महिलेने छेड छाड काढणाऱ्या व्यक्तीला मारतानाचा व्हिडीओ सोशल मिडीया मध्ये व्हायरल झाल्यानंतर महिलेच्या धाडसाच मोठ कौतुक होत आहे. प्रिया लष्करे अस या रणरागीनीच नाव आहे. प्रिया यांचे सासर पुणे येथे तर, नाशिकमध्ये माहेर आहे. सध्या प्रिया लष्करे या कोपरगाव तालुक्यातील खाजगी शाळेत शिक्षेका म्हणुन काम करतात.
प्रिया या PMPL बसने प्रवास करत होता. यावेळे बसमध्ये असलेल्या एका मद्यपी व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप प्रिया यांनी केला आहे. मद्यपीचे कृत्य पाहून प्रिया चिडल्या. त्यांनी थेट या मद्यपची कॉलर पकडली आणि त्याला चांगलाच चोप दिला. प्रिया यांनी मद्यपीवा 25 थप्पड लगावल्याचे व्हिडिओत दिसत आहे. बसमधील प्रवाशांनी हा प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला.
Pune Woman Slaps Drunk Man | पुण्यात मद्यधुंद तरुणाला महिलेचा चोप#pune #drunkman #zee24taas pic.twitter.com/AzrN178A3T
— ZEE २४ तास (@zee24taasnews) December 19, 2024
व्हिडिओ मध्ये प्रिया या खूपच चिडलेल्या दिसत आहेत. कुठ हात लावला तु माझ्या? काय केलं तु? असे प्रश्न त्या छेड काढणाऱ्या मद्यपीला विचारत असल्याचे दिसत आहे. तो मद्यपी हात जोडून ताई ताई म्हणत त्यांची माफी मागत आहे. मद्यपीला तुम्ही बसमध्ये कसा प्रवेश दिला असा प्रश्न प्रिया यांनी बसच्या कंडक्टरला विचारला. त्याने कुणाला काही केले नाही असे उत्तर कंडक्टरे प्रिया यांना दिले. पण, कुणी छेडले तर आम्ही सोडत नाही कंडक्टर म्हणाले. कंडक्टरचे उत्तर ऐकून प्रिया यांचा संताप अनावर झाला. बसमधून अनेक तरुण मुली प्रवास करतात. तुम्ही मुलींची छेड काढेपर्यंत वाट पाहणार का? असा प्रश्न प्रिया यांनी कंडक्टरला विचारला. यानंतर प्रिया यांनी बस थेट पोलिस स्टेशनला घ्यायला सांगितली .