close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असणाऱ्या अभिनेत्रीच्या पतीची सुटका

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं.

Updated: Aug 14, 2019, 01:58 PM IST
मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असणाऱ्या अभिनेत्रीच्या पतीची सुटका

मुंबई : मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी हिचा दुसरा पती, अभिनव कोहली याची पोलिसांच्या तावडीतून सुटका झाली आहे. पहिल्या पतीपासूनची मुलगी पलक हिचा अभिनवने विनयभंग केल्याचा आरोप श्वेताकडून करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. 

'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार मंगळवारी अभिनवला न्यायालयापुढे हजर  करण्यात आलं. ज्यानंतर १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याची सुटका करण्यात आली. 

सूत्रांच्या माहितीनुसार कांदिवली येथील समतानगर पोलीस स्थानकात श्वेताने तिच्या पतीविरोधात तक्रार दाखल केली होती. आपल्या मुलीला अश्लील फोटो दाखवल्याप्रकरणी आणि तिच्याविषयी अश्लील टीप्पणी केल्याप्रकरणी श्वेताने हे पाऊल उचललं होतं. ज्यानंतर भारतीय दंडसंविधानाच्या कलम ५०९, ३५४ (अ), ३२३, ५०४, ५०६ अशा कलमांन्वये आणि आयटी कायद्याच्या ६७-अ अंतर्गत रविवारी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं.

वाचा : सावत्र वडिलांच्या आक्षेपार्ह वर्तणुकीविषयी ... 

 

रम्यान, अद्यापही या प्रकरणी तपास सुरु आहे. श्वेताने याविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर तिची मुलगी पलक हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. ज्यामाध्यमातून तिने या सर्व प्रकरणी होणाऱ्या चुकीच्या चर्चा आणि काही गोष्टींविषयी महत्त्वाचे खुलासे केले होते.